शिक्षणापासून वंचित दुर्बल बालकांसाठी बिगबुलतर्फे आर्थिक योगदान…

डिजिटल अॅसेट ( Digital Asset ) आणि फायनान्शियल मॅनेजमेंट स्टार्टअप बिगबुल तर्फे पुण्यातील आळंदी येथील स्नेहवन आश्रम या एनजीओला आर्थिक दुर्बल बालकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी निधी देण्यात आला आहे.

    पुणे : डिजिटल अॅसेट ( Digital Asset ) आणि फायनान्शियल मॅनेजमेंट स्टार्टअप बिगबुल तर्फे पुण्यातील आळंदी येथील स्नेहवन आश्रम या एनजीओला आर्थिक दुर्बल बालकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी निधी देण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शेतकरी आणि गरीब कुटुंबातील वंचित बालकांसाठी पोषक आणि सर्वसमावेशक शैक्षणिक वातावरण तयार करणे हे त्यामागील उद्दिष्ट आहे.

    दरम्यान प्रतिकूल परिस्थिती आणि वातावरणामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांसाठी स्नेहवन ही एक चळवळ आहे. स्नेहवन आश्रम ही संस्था वंचित मुलांचे जीवन सुधरवण्यास मदत करते. ज्या कुटुंबांनी शेती व्यवसायात अंशतः किंवा पूर्ण कुटुंब गमावले आहे अशा कुटुंबांतील ही मुले आहेत. स्नेहवन मध्ये दर्जेदार शिक्षण आणि शालेय शिक्षणासोबतच येथे मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करून त्यांची तयारी करून घेण्यात येते.

    बिगबुलच्या पुढाकारातून १,००,००० डिजिटल मालमत्ता दान करण्यात आल्या आहेत. स्नेहवन आश्रमाच्या इतिहासात अशा प्रकारची मालमत्ता दान करण्याची घटना प्रथमच घडली आहे. बिगबुलने केवळ डिजिटल मालमत्ताच दान केली नाही तर ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर पुरेसे ज्ञान देण्याचे आश्वासनही दिले आहे. बिगबुल ही संस्था क्रिप्टोकरन्सी, फॉरेक्स आणि स्टॉक ट्रेडिंगसाठी एक अग्रणीय प्लॅटफॉर्म म्हणून उदयास आली आहे. सर्वात सोप्या इंटरफेसमध्ये सर्वात गुंतागुंतीच्या अॅसेट बिल्डिंग सिस्टम प्रदान करणे हे कंपनीचे ध्येय आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाची भरभराट होऊन तो सक्षम होऊ शकेल.ब्लॉकचेन प्रणाली मजबूत करणे आणि व्यवहार स्वस्त, जलद आणि विश्वासार्ह आहेत याची खात्री करणे हे कंपनीचे धोरण आहे.

    बिगबुलचे संस्थापक आणि सीईओ डॉ. रवींद्र पोतदार म्हणाले की आम्ही स्नेहवन आश्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचा मुलांबाबतचा उत्साह आणि काम खरोखरच उल्लेखनीय आहे. त्यांचे काम आणि त्यांनी आतापर्यंत घडवून आणलेला बदल प्रकर्षाने दिसून येतो. स्नेहवन आश्रमाशी निगडीत असल्याचा आम्हाला खरोखरच आनंद आणि अभिमान वाटतो आणि त्यांच्या भविष्यातील सर्व उपक्रमांमध्ये आम्ही त्यांना पाठिंबा देऊ.”

    स्नेहवन आश्रमाचे संस्थापक अशोक देशमाने म्हणाले की, आम्ही बिगबुलचे आणि या उदात्त कार्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे खरोखर आभारी आहोत. या सर्व पैशांचा वापर प्रत्येक संभाव्य मार्गाने मुलांच्या चांगल्यासाठी इष्टतम वापर केला जाईल, हे आम्ही सुनिश्चित करू.