बीडमध्ये करुणा मुंडेंच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ; साड्या घेण्यासाठी महिला आल्या अन्…

बीडमध्ये करुणा मुंडे यांंच्या कार्यक्रमात गोंधळ उडाला. यामुळे काही काळ हा कार्यक्रम थांबवण्यात आला, तसेच घटनास्थळी पोलिसांनाही पाचारण करावं लागलं.

    बीड : बीडमध्ये करुणा मुंडे यांंच्या कार्यक्रमात गोंधळ उडाला. यामुळे काही काळ हा कार्यक्रम थांबवण्यात आला, तसेच घटनास्थळी पोलिसांनाही पाचारण करावं लागलं. बीड शहरात करुणा मुंडे यांच्या वतीनं साड्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र साड्या घेण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली आणि गोंधळ निर्माण झाला.

    साड्यांचं वाटप सरू असताना महिलांनी थेट स्टेजवर जाण्याचा प्रयत्न केला, तसेच एकमेकींच्या हातातून साड्या ओढण्याचा प्रयत्न देखील केल्याचं पाहायला मिळाले.

    नेमकं काय घडलं? 

    बीड शहरात साड्या वाटपाच्या कार्यक्रमात महिलांची साड्या घेण्यासाठी मोठी झुंबड उडाली यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. हा गोंधळ थांबवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. स्वराज्य शिवशक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा करुणा शर्मा, मुंडे यांच्या वतीने बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर लोकसभा निवडणुकीचा कार्यकर्ता मेळावा व महिलांना साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.