Big decision of Railway Ministry! ‘Masks’ mandatory on train travel

देशभरात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे खबरदारी म्हणून रेल्वे मंत्रालयाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवासात प्रवाशांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने जारी करण्यात आलेल्या एसओपीचे पालन करण्याचे आदेश देशातील सर्व रेल्वे झोनल कार्यालयांना दिले आहे. रेल्वेचा प्रवास करत असाल तर मास्क घाला असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना सूचना देण्यात आल्या आहेत(Big decision of Railway Ministry ‘Masks’ mandatory on train travel).

    मुंबई : देशभरात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे खबरदारी म्हणून रेल्वे मंत्रालयाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवासात प्रवाशांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने जारी करण्यात आलेल्या एसओपीचे पालन करण्याचे आदेश देशातील सर्व रेल्वे झोनल कार्यालयांना दिले आहे. रेल्वेचा प्रवास करत असाल तर मास्क घाला असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना सूचना देण्यात आल्या आहेत(Big decision of Railway Ministry Masks Mandatory On Train Travel).

    रेल्वे मंत्रालयानं याबाबत एक परिपत्रक जारी केले असून त्याबाबतच्या विस्तृत सूचना या सर्व झोनना देण्यात येणार आहेत. यामध्ये कोरोनाचा धोका लक्षात घेता प्रवाशांनी मास्कचा वापर करावा असं सांगण्यात येत आहे. पण ही मास्क सक्ती नाही असे ही स्पष्ट करण्यात आले आहे. दिल्लीसारख्या काही राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्या राज्यामध्ये मास्कची सक्तीही करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत त्या राज्यांमध्ये प्रवास करताना मास्कचा वापर करावे.

    महाराष्ट्रासारख्या काही राज्यांमध्ये मास्कचे बंधन हटवण्यात आले आहे. अशा राज्यांमध्ये प्रवास करताना जर एखाद्याने मास्क वापरला नाही तर त्याचा दंड लागणार नाही, पण तरीही प्रवाशांनी मास्कचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आता देशात कोरोनाचा वाढता वेग पाहता रेल्वे मंत्रालयाने पुन्हा कोविड नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली आहे.