प्रशासनाचा मोठा निर्णय! आता बाळाचा जन्म होताचं त्याचे आधारकार्ड काढणं अनिवार्य

    आता देशात आधारकार्ड असणं अत्यंत गरजेच झालं आहे. सर्वसामान्य असो सेलिब्रिटी वा राजकीय नेता सगळ्यांकडे आधारकार्ड असणं बंधनकारक आहे. तरी आता बाळाचा जन्म होताचं त्या बाळाचे आधारकार्ड काढणं अनिवार्य असणार आहे, असे निर्देश नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिले आहे. सध्या हा निर्णय फक्त नागपूर जिल्ह्यात लागू असला तरी येणाऱ्या काहीच दिवसांत हा निर्ण संपूर्ण राज्यात लागू होवू शकतो. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्देशानुसार आता इस्पितळात बाळ जन्मताचं बाळाचं आधार कार्ड काढल्या जाणार आहे. बाळाचा जन्म शासकिय निमशासकीय वा खासगी इस्पितळात झाला तरी अगदी सोप्या पध्दतीने नवजात बालकाचं आधारकार्ड काढणं शक्य होणार आहे. तरी आरोग्य विभाग आणि पोस्ट विभाग यांच्या समन्वयाने जन्मलेल्या बाळाची आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया पुर्ण होणार आहे. तरी तुमच्या घरी वा तुमच्या प्रियजनांच्या घरी नवजात शिषु असल्याचं लवकरचं त्याचे आधार कार्ड काढणं शक्य होणार आहे.

    बाळाचे जन्म झाल्यावर इंडिया पोस्ट पेंमेंट बँक आधार नोंदणी कर्मचाऱ्यांना बोलावून बाळाचे आधार कार्ड तात्काळ काढून देण्यात येणार आहे. तसेच खाजगी आरोग्य संस्थांमध्ये जन्म झालेल्या बालकांची संबंधित संस्थाप्रमुखांना गुगल शिटमध्ये परिपूर्ण माहिती भरावी लागणार आहे. संस्थेला संबंधित फॉर्म क्रमांक एक भरून कार्यक्षेत्रातील झोन सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयातील जन्म-मृत्यू नोंदणी विभागास सादर करावा लागणार आहे.