महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी, राज ठाकरे विधान भवनात दाखल, ठाकरे गटाकडून निलम गोऱ्हे हजर

थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल. विरोधी पक्षनेते अजित पवार कार्यक्रमासाठी विधान भवनात दाखल झाले आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील विधान भवनाच्या दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

    मुंबई : महाराष्ट्राचे दिवंगत ज्येष्ठ नेते आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आज विधानसभेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. विधान भवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आलाय. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल. विरोधी पक्षनेते अजित पवार कार्यक्रमासाठी विधान भवनात दाखल झाले आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील विधान भवनाच्या दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. पण उद्धव ठाकरे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार नाहीत. विधान परिषदेच्या अध्यक्षा निलम गोऱ्हे कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत.

    शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मेळावा
    दुसरीकडे षन्मुखानंद सभागृहात शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आपल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे षण्मुखानंद सभागृहाच्या दिशेला रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरे षण्मुखानंद सभागृहात जाण्याआधी रिगल सिनेमाजवळ थांबले. तिथे बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं. यावेळी शेकडो शिवसैनिक रिगल सिनेमाजवळ दाखल झालेले होते. बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवानदन केल्यानंतर उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे आणि लहान मुलगा तेजस ठाकरे षण्मुखानंद सभागृहाच्या दिशेला मेळाव्यासाठी रवाना झाले.