fire in tarapur midc

तारापूर (Tarapur Fire) औद्योगिक क्षेत्रातील कॅम्लीन नाका परिसरातील प्लॉट नंबर E-६/३ व E-४ स्थित केंबोंड केमिकल या कंपनीत भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या व बोईसर (Boisar)एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कंपनीतील कामगारांना कंपनी बाहेर सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

    बोईसर : तारापूर (Tarapur Fire) औद्योगिक क्षेत्रातील केमिकल कंपनीत स्फोट होऊन लागलेल्या भीषण आग (Fire) लागल्याची घटना गुरुवारी घडली आहे. (Palghar Fire) या दुर्घटनेत एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. दुलेश पाटील असे मृत कामगाराचे नाव असून तो कंपनीत प्रॉडक्शन मॅनेजर पदावर कार्यरत होता. कॅम्लीन नाका परिसरातील प्लॉट नंबर इ-६/३ व इ-४ स्थित केंबोंड केमिकल या कंपनीत ही भीषण आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या व बोईसर एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कंपनीतील कामगारांना कंपनी बाहेर सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

    तारापूर औद्योगिक क्षेत्रातील केंबोड केमिकल या कंपनीत आज सकाळच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटमुळे कंपनीत भीषण आग लागली. आगीचे वृत्त कळताच बोईसर एमआयडीसी पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या. यानंतर कंपनीतील सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र कंपनीतील प्रोडक्शन मॅनेजर दुलेश पाटील यांचा दुर्दैवाने होरपळून मृत्यू झाला. आगीचे कारण अजूनही अस्पष्ट असून अग्निशमन दल पुढील तपास करीत आहे.