बॉयलर चिकनच्या भावात मोठी वाढ; कडक उन्हाळा, पाणी टंचाईमुळे पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत

उन्हाच्या तीव्रतेमुळे तापमाणाने देखील उच्चांक गाठला असल्याचे चित्र दिसत असल्याने त्याचा परिणाम शेती व कुक्कुटपालन वर होत असताना पाणी टंचाई व उन्हाची तीव्रता यामुळे अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी त्यांचे शेड मोकळे ठेवलेले असल्याने कोंबड्या मिळणे कठीण झाले मात्र त्यामुळे बॉयलर चिकनच्या बाजारभावात वाढ झाली आहे.

  शिक्रापूर : उन्हाच्या तीव्रतेमुळे तापमाणाने देखील उच्चांक गाठला असल्याचे चित्र दिसत असल्याने त्याचा परिणाम शेती व कुक्कुटपालन वर होत असताना पाणी टंचाई व उन्हाची तीव्रता यामुळे अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी त्यांचे शेड मोकळे ठेवलेले असल्याने कोंबड्या मिळणे कठीण झाले मात्र त्यामुळे बॉयलर चिकनच्या बाजारभावात वाढ झाली आहे.

  सण उत्सवासह मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना सुरु असताना यात्रेचे दिवस सुरु झालेले असल्यामुळे एकीकडे सर्वत्र चिकनला मागणी वाढत आहे. तर दुसरीकडे पाणी टंचाई व उन्हाची तीव्रता यामुळे अनेक पोल्ट्री व्यवसायिकांनी त्यांचे पोल्ट्रीचे शेड मोकळे ठेवणे पसंत केले असल्यामुळे बाजारात बॉयलर कोंबड्या मिळणे कठीण होऊ लागले आहे, एक महिन्यापूर्वी १८० रुपये किलोने विक्री केल्या जाणाऱ्या चिकनचे भाव सध्या २४० ते २६० रुपयांवर जाऊन पोहचले आहे, मात्र कोठेही कोंबड्या शिल्लक नसल्यामुळे चिकन दुकानदारांना माल देणाऱ्या एजंट लोकांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे.

  परंतु आपला व्यवसाय टिकविण्यासाठी सर्वच जण अतोनात प्रयत्न करत आहेत, काही दिवसांपूर्वी बॉयलर कोंबड्यांना बाजार भाव नसताना मात्र कोंबड्यांना दिली जाणारी औषधे व खाद्य महाग होत होती त्यामुळे खर्च जास्त व बाजारभाव कमी अशी अवस्था झालेली असताना सर्वच ठिकाणी पोल्ट्रीतील शेड फुल भरलेले होते परंतु दर कमी होत होता, तर सध्या बाजार भाव जास्त असताना पोल्ट्री व्यावसायिकांकडे कोंबड्या शिल्लक नाहीत त्यामुळे चणे आहेत तर दात नाहीत अन् दात आहेत तर चणे नाही अशी अवस्था पोल्ट्री व्यावसायिकांची झाली आहे. मात्र पुढील काळात बाजारात कोंबड्या उपलब्ध न झाल्यास यापेक्षा देखील जास्त भाव होण्याची शक्यता अनेक पोल्ट्री व चिकन व्यावसायिकांनी वर्तवली आहे.

  कोंबड्या उपलब्ध नसल्याने भाव वाढ

  सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची कमरता व उष्णतेमुळे पक्षी मरण्याचे प्रमाण वाढत असते तर पाण्याच्या कमतरतेमुळे अनेकांनी त्यांचे पोल्ट्री शेड मोकळे ठेवले आहेत, त्यामुळे सध्या कोंबड्या शिल्लक नाहीत त्याचा परिणाम बाजार भावावर झाला असल्याने दर वाढले असल्याचे शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा परिसरात कोंबड्या सप्लाय करणारे होलसेल विक्रेते व्यवसायिक आबा भगत व इरफान मुलाणी यांनी सांगितले आहे.

  चिकनचे दर वाढल्याने ग्राहक कमी होत आहेत. दर वाढ झाल्याने ठराविक ग्राहक चिकन घेण्यास पसंती देत आहेत, त्यामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे.

  -सिकंदर शेख, संचालक आयन चिकन सेंटर, शिक्रापूर

  व्यावसायिक चिंतेत

  एक महिन्यापूर्वी चिकन दुकानदार ग्राहकांना १८० रुपये किलो दराने चिकन विक्री करत होते. मात्र आज दुकानदारांना मिळणारी जिवंत कोंबडीच १७३ रुपये दराने मिळत असल्याने चिकनचे बाजार भाव गडाडल्याने दुकाने ओस पडू लागली असताना चिकन व्यावसायिक देखील चिंता व्यक्त करु लागले आहे.