मोठी बातमी! चंद्रपूरमध्ये दीडशे नागरिकांना अन्नातून विषबाधा; एकाचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनं खळबळ उडाली आहे. एका धार्मिक कार्यक्रमानंतर आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक भोजनातून तब्बल 150 नागरिकांना विषबाधा झाली आहे.

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनं खळबळ उडाली आहे. एका धार्मिक कार्यक्रमानंतर आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक भोजनातून तब्बल 150 नागरिकांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या नागरिकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. रामप्रेक्ष यादव असं या व्यक्तीचं नाव आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

    मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दीडशेहून अधिक लोकांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. माजरी येथे काल नवसाची पूजा होती. यानिमित्त रात्री जेवण ठेवण्यात आले होते. अंदाजे पाचशेवर लोक या पूजेत सहभागी झाले होते. पूजेनंतर सर्वांनी जेवण केले, महाप्रसादाचा लाभ घेतला. जेवण करून कार्यक्रम उरकल्यानंतर सर्व व्यक्ती घरी गेल्या. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अचानक त्रास जाणवू लागला. पाहता पाहता 150 पेक्षा जास्त लोकांना विषबाधा झाल्याचे लक्षात आले.

    नंतर हा एकदा वाढतच गेला त्यामुळे हॉस्पीटल देखील कमी पडू लागले. त्यामुळे काही जणांना भद्रावती आणि वरोरा येथे हलवण्यात आले. या सर्व रुग्णांना अन्नातून विषबाधा झाल्याचे कारण समोर आले आहे. सध्या रुग्णांवर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

    एकाचा मृत्यू

    दरम्यान या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. रामप्रेक्ष यादव असं या व्यक्तीचं नाव आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. एकाच वेळेस 150 पेक्षा जास्त जणांना विषबाधा झाल्यानं खळबळ उडाली आहे.