मोठी बातमी! रस्ता ओलांडताना आमदार बच्चू कडू यांचा अपघात; उपचार सुरु, ‘या ठिकाणी’ झाला अपघात…

सुसाट वेगान दुचाकीनं धडक दिल्यामुळं बच्चू कडू यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावही झाला. मात्र, सुदैवाने बच्चू कडू या अपघातातून बचावले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांची प्रकृती चांगली असल्याचं व सुधारत असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं आहे.

    अमरावती: राज्याच्या राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी मंत्री, आमदार व प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bachu Kadu) यांचा अपघात (Accident) झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीने (bike) जोरदार धडक दिल्याने बच्चू कडू यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर मार लागला आहे. आमदार बच्चू कडू हे आज पहाटे 6 ते 6.30च्या दरम्यान रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी सुस्साट वेगात आलेल्या दुचाकीने बच्चू कडू यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे बच्चू जागेवरच कोसळले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

    दरम्यान, सुसाट वेगान दुचाकीनं धडक दिल्यामुळं बच्चू कडू यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावही झाला. मात्र, सुदैवाने बच्चू कडू या अपघातातून बचावले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांची प्रकृती चांगली असल्याचं व सुधारत असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं आहे. डोक्याला चार टाके मारण्यात आले. त्यांच्या डोक्याला आणि पायाला बँडेज लावण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून चिंतेचं काही कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

    मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या अपघातामध्ये वाढ होताना दिसत आहे.  मागील महिन्यात भाजपाचे आमदार जयकुमार गोरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाला होता, त्यानंतर आज बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. कडू यांना दुचाकीस्वाराने धडक दिल्याने बच्चू कडू हे रोडच्या डिव्हायडरवर आदळल्याने त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला. या अपघातात बच्चू कडू यांना मुक्कामार लागल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, दुचाकीस्वाराबाबतची काहीच माहिती मिळाली नाही. दुचाकीस्वाराच पोलीस शोध घेतायेत.