मोठी बातमी! रायगडमध्ये भीषण अपघात, ९ जणांचा जागीच मृत्यू तर अनेकजण जखमी; मृतांमध्ये चार महिलांचा समावेश, मदतकार्य सुरु…

रायगडमध्ये झालेल्या या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अपघातात लहान मुल बचावलं आहे. या मुलावर माणगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, मदत कार्य सुरु केले आहे.

    रायगड- नवीन वर्षात अपघाताच्या (Accident) घटना काही कमी होताना नाव घेत नाहीत, मागील आठवड्यात नाशिक (Nashik) येथे मोठी अपघाताची घटना ताजी असतानाच, आज पहाटे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (mumbai goa national highway) भीषण अपघात झाला आहे. रायगडमध्ये झालेल्या या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू (Nine dead) झाला आहे. तर, अपघातात लहान मुल बचावलं आहेत. या मुलावर माणगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, मदतकार्य सुरु केले आहे. या अपघातात ४ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. या अपघातामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    दरम्यान, पहाटे पाचच्या सुमारास ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो विरुद्ध दिशेला जावून समोरून येणाऱ्या इको कारला धडकला. याची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महार्गावार वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच, अपघातग्रस्त कार बाजूला करण्यात येत आहे. तसेच जखमींवर उपचार सुरु आहे.

    ट्रक आणि इको कारमध्ये हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, ९ जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये ४ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहेत. या अपघातात ४ वर्षाचं लहान मुल बचावलं आहे. त्याच्यावर माणगाव येथीस सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे, पोलीस पुढील तपास करताहेत.