Big News! खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी; ‘या’ व्यक्तीच्या नावे धमकी…

आता ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी (threat) देण्यात आली आहे. त्यामुळं खळबळ माजली असून, याबाबत अधिक तपास पोलीस (Police) करत आहेत.

मुंबई : राजकीय क्षेत्रातून एक सर्वांत मोठी बातमी समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमकीत वाढ होत असताना, आता ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी (threat) देण्यात आली आहे. त्यामुळं खळबळ माजली असून, याबाबत अधिक तपास पोलीस (Police) करत आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार धमकी देणारा व्यक्ती पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. (death threat to mp sanjay raut threat) तसेच याआधी संजय राऊतांनी आपणाला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली होती, असा आरोप केला होता. त्यानंतर आता पुन्हा संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. त्यामुळं त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी…

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी पंजाबमधील खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. तर धमकी देणारा व्यक्ती पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमकीत वाढ होत असताना, आता ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

राजकीय नेत्यांना धमकीच्या फोनमध्ये वाढ…

मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमकीत वाढ होत दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकातून खंडणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. तर भाजपाचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांना असाच जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. मागील महिन्यात आदित्य ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. तर अशोक चव्हाण यांनी देखील आपल्यावर पाळत ठेवली जात असून, आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. तर काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नीवर हल्ला करण्यात आला होता. तसेच याआधी संजय राऊतांनी आपणाला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली होती, असा आरोप केला होता. त्यानंतर आता पुन्हा संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. त्यामुळं त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.