मोठी बातमी! राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, ‘या’ कारणामुळं ईडीकडून नोटीस…

जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केला गेला असल्याचा आरोप होता. जयंत पाटील यांना सोमवारी हजर राहण्याचं समन्स देण्यात आलं आहे.

    सांगली : आज एकिकडे राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल येण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तासंर्घावरुन वातावरण तापले असताना, आणि या निकालाची उत्सुकता संपूर्ण देशाला लागली असाताना, दुसरीकडे राजकीय क्षेत्रातून एक खळबळजन बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीची (ED) नोटीस (Notice) आली आहे. जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केला गेला असल्याचा आरोप होता. जयंत पाटील यांना सोमवारी हजर राहण्याचं समन्स देण्यात आलं आहे. त्यामुळं ईडीकडून नोटीससत्र आणि चौकशीसत्र हे पुन्हा एकदा सुरुच आहे, अशी चर्चा सुरु आहे.

    केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर फक्त विरोधकांवर ?

    दरम्यान, जेव्हापासून देशात व राज्यात भाजपाचे सरकार आले आहे, तेव्हापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा सुळसुळाट वाढला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाल्या आहेत, आणि याचा वापर फक्त विरोधकांना नामोहरम करण्यासाठीच केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. फक्त सातत्याने ईडी, आयकर विभाग, सीबीआय आदी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर फक्त विरोधकांवर होत आहे, असा आरोप राज्यासह देशातील विरोधकांनी केला आहे. दरम्यान, आता जयंत पाटलांना पाठवलेल्या नोटीशीनंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

    कोणत्या कारणामुळं पाठवली नोटीस?

    मिळालेल्या माहितीनुसार आता जयंत पाटील यांना ईडीने चौकशीसाठी पाचारण केले आहे. ILFS प्रकरणात सर्वप्रथम दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती पाहता हे प्रकरण सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडे सोपवण्यात आले होते. आयएलएफस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. ILFS च्या माध्यमातून अनेक बड्या लोकांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. यापूर्वी या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर आता जयंत पाटलांना नोटीस पाठवण्यात आली आहे. येत्या सोमवारी जयंत पाटील यांची ई़डीकडून चौकशी होणार आहे. मात्र, आता या नोटीसवर जयंत पाटील काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.