मोठी बातमी! माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या कारला काशिमीरा येथे अपघात; अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरु

डॉ. सावंत हे शुक्रवारी सकाळी पालघरला जात होते. त्यांची कार काशिमीरा येथे आली तेव्हा मागून एका डंपरने कारला धडक दिली. या अपघातात त्यांनाही गंभीर इजा झाली असून, त्यांच्या मानेला आणि पाठीला मार लागलेला आहे.

  मुंबईः राज्याच्या राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत (Deepak Sawant) यांच्या कारला काशिमीरा येथे अपघात झाला आहे. डॉ. दीपक सावंत हे अपघातात (Accident) जखमी झाले आहेत. कारचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या सावंत यांच्यावर उपचार सुरु आहेत. डॉ. सावंत यांच्या मानेला व पाठिला दुखापत झाली आहे. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी (Police) डॉ. सावंत यांना उपचारासाठी (Hospital) मुंबईला पाठवले आहे. डंपरच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरु आहे.

  दरम्यान, पालघरच्या दिशेने जात असताना त्यांच्या कारला डंपरने मागून धडक दिली असून या अपघातात त्यांच्या कारचं मोठं नुकसान झालंय. पालघर येथील आश्रमशाळेत एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या मृत्यूबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी डॉ. सावंत हे शुक्रवारी सकाळी पालघरला जात होते. त्यांची कार काशिमीरा येथे आली तेव्हा मागून एका डंपरने कारला धडक दिली. या अपघातात त्यांनाही गंभीर इजा झाली असून, त्यांच्या मानेला आणि पाठीला मार लागलेला आहे. काशिमीरावरुन त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात आणण्यात आलंय. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

  कोण आहेत दीपक सावंत?

  – दीपक सावंत हे विधानपरिषदेचे माजी सदस्य आहेत

  – जुलै २००४ मध्ये त्यांची पहिल्यांदा विधानपरिषदेवर वर्णी लागली

  – २००६ आणि २०१२ मध्ये ते पुन्हा निवडून आले.

  – मात्र त्यांना तिसऱ्या वेळी तिकीट नाकारण्यात आले.

  – डिसेंबर २०१४ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात दीपक सावंत यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले.