Hasan Mushrif, Kirit Somaiya's next target; Will give sensational evidence in Pune tour

कोल्हापुरातील कागल येथे आप्पासाहेब नलावडे गडहिग्लज साखर कारखाना हा अनधिकृतपणे चालविला जात असल्याचा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच आमदार हसन मुश्रीफ यांचे जावई व स्वत: मुश्रीफ यांनी या कारखान्यात 100 कोटीचा घोटाळा तसेच आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

    कोल्हापूर- माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर ईडी (ED) आणि आयकर विभागाने (Income tax) धाडी टाकली आहे. आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील (kolhapur) कागल येथील घरांवर पहाटे 6.30 वाजल्यापासून छापेमारी सुरु आहे. या छापेमारीत जवळपास 20 अधिकारी सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे. मागील वर्षी देखील आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी व कार्यालय येथे छापेमारी केली होती. त्यानंतर आता दुसऱ्यांदा पुन्हा एकदा आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी आणि आयकर विभागाने धाडी टाकली आहे.

    दरम्यान, कोल्हापुरातील कागल येथे आप्पासाहेब नलावडे गडहिग्लज साखर कारखाना हा अनधिकृतपणे चालविला जात असल्याचा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच आमदार हसन मुश्रीफ यांचे जावई व स्वत: मुश्रीफ यांनी या कारखान्यात 100 कोटीचा घोटाळा तसेच आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच याआधी देखील याची चौकशी व्हावी अशी मागणी सोमय्यांनी केली होती. आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, कागल, गडहिंग्लज या ठिकाणी सध्या ईडी छापेमारी करत आहे.

    मुश्रीफ यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी…

    आज पहाटे सकाळी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी आयकर विभाग व ईडीने छापेमारी करत असल्याची माहिती मिळताच, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. कारण मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील त्यांना मानणार एक मोठा गट तसेच त्यांचा चाहता वर्ग आहे. आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाडी पडल्यामुळं कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून, कार्यकर्त आक्रमक झाले आहेत. तसेच ह कार्यकर्ते आयकर विभाग व ईडीच्या विरोधात घोषणाबाजी करत आहे.