पोलिसांनी आव्हाडांना ताब्यात घेतलं आहे. ठाण्यातील विवियान मॉलमध्ये चित्रपट बंद पाडण्यावरुन मोठा वाद झाला होता, तसेच यावेळी हाणामारी सुद्धा झाली होती. तसेच एका कुंटुबाला मारहाण करण्यात आली होती. यानंतर त्या कुंटुबाने पोलिसात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी आता आव्हाडांना ताब्यात घेतलं आहे.

    ठाणे – सध्या राजकीय क्षेत्रातून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना ताब्यात घेतलं आहे. ठाणे मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद पाडला होता, त्यावेळी मोठा राडा झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आव्हाडांना ताब्यात घेतलं आहे. ठाण्यातील विवियान मॉलमध्ये चित्रपट बंद पाडण्यावरुन मोठा वाद झाला होता, तसेच यावेळी हाणामारी सुद्धा झाली होती. तसेच एका कुंटुबाला मारहाण करण्यात आली होती. यानंतर त्या कुंटुबाने पोलिसात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी आता आव्हाडांना ताब्यात घेतलं आहे.

    …तर मला आनंदच

    दरम्यान, जितेंद्र आव्हाडांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शिवरायांची बदनामी रोखली म्हणून मला अटक होत असेल तर, त्याचे मी स्वागतच करतो, असं आव्हाडांनी म्हटलं आहे. तसेच मी स्वता: जेलमध्ये जाऊन बसेन… हे सरकार नेमकं कोणाचं आहे? शिवरायांची बदनामी करणाऱ्यांचे आहे का? असा सवाल देखील आव्हाडांनी उपस्थित केला आहे.