
सत्यजीत तांबे यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाची आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. एकीकडे सत्यजीत तांबे यांच्या विजयाची खात्री दाखवत कार्यकर्ते जल्लोषाची तयारी करत आहेत. सत्यजीत तांबेंसाठी एक दुख:द बातमी समोर आली आहे.
पुणे : नाशिक (Nashik) ग्रामीणचे युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार (Manas Pagar) यांचं अपघाती (Accident) निधन झालं आहे. मानस पगार हे युवक काँग्रेसमधील चर्चेतला चेहरा म्हणून ओळखले जायचे. ते सोशल मीडियावर काँग्रेसची भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडत. सत्यजीत तांबे यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाची आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. एकीकडे सत्यजीत तांबे यांच्या विजयाची खात्री दाखवत कार्यकर्ते जल्लोषाची तयारी करत आहेत. सत्यजीत तांबेंसाठी एक दुख:द बातमी समोर आली आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली
माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे. pic.twitter.com/R7Qfcv5aRr
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 2, 2023
मानस पगार यांच्या आंदोलनाची चर्चा
दरम्यान, मानस पगार यांची पक्षानेही त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात त्यांनी आपले प्राण गमावले. आज पहाटे मानस पगार यांचे अपघाती निधन झाले आहे. मानस पगार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घराबाहेर दीर्घकाळ केलेल्या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती. दानवेंनी शेतकऱ्यांसाठी वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेमुळे त्यांच्या घरासमोर उपोषण करण्यात आलं होतं.
तांबेंचं ट्विट.. निशब्द करणारी बातमी
पगार यांच्या निधनानंतर युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ट्वीट करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. “माझा खंबीर पाठीराखा, सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे”, असं तांबे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.