आश्चर्यकारक! जिल्हाधिकारी कार्यालयात शिरला भला मोठा साप…!

गर्दीने गजबजलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भला मोठा साप असल्याचे आढळून आले. कार्यालयामध्ये साप आढळल्यामुळे सर्वांची बंबेरी उडाली.

    अलिबाग : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेहमी माणसांची वर्दळ असते. अनेक कामांसाठी याचिकाकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येत असतात. त्यामुळे नेहमी गर्दीने गजबजलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भला मोठा साप असल्याचे आढळून आले. कार्यालयामध्ये साप आढळल्यामुळे सर्वांची बंबेरी उडाली.

    आज (दि.29) रोजी अकलूजच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कामाची लगबग सुरु होती. यावेळी खालच्या मजल्यावर असलेल्या नोंदणी शाखेत येणारे जाणारे याचिकाकर्ते आपली टपाल नोंदवित होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास एक महिला कर्मचारी कक्षातील जमा झालेल्या फायलीची आवरासावर करत असताना, त्यांच्या हाताला मऊ असा स्पर्श जाणवला. त्याठिकाणी कटाक्ष टाकून पाहिले असता, फाईलीच्या आडोश्यात एक भला मोठा साप असल्याचे लक्षात आहे. कार्यालयामध्ये अचानक सापाला पाहून कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. घाबरून सर्वजण कक्षाच्या बाहेर जाऊन उभे राहिले.

    जिल्हाधिकारी कार्यालयात साप सापडल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी सर्पमित्रांनी फोन करुन बोलून घेतले. सर्पमित्राने तातडीने येऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील सापाला पकडले. हा साप धामण प्रजातीला आणि बिनविषारी असल्याचे कळताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र हा साप थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती भागात शिरल्यामुळे सर्वांना धक्का बसला. कार्यालयाच्या साफसफाईची मागणी आता केली जात आहे.