
दुसरीकडे महाविकास आघाडीत मोठी फूट पडल्याचं बोललं जात आहे, एकिकडे काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याने दुसरीकडे मविआत समन्वय नसल्याचं समोर आलं आहे. त्यात उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. कारण
मुंबई– कॉंग्रेसने नाशिक (Congress Nashik) पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांवर कारवाई केल्याने आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा निर्माण झाली आहे. दरम्यान अपक्ष महिला उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi patil) यांनी उध्दव ठाकरे (Udhav thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संपर्क साधला आहे. त्यामुळे यावर आज अंतिम निर्णय होईल अशी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) तसेच मविआतील नेत्यांनी सांगितली आहे. त्यामुळं विरोधी पक्षाच्या उमेदवारांना पाठींबा द्याचा की नाही यावर आज मविआच्या बैठकीत निर्णय होणार आहे.
महाविकास आघाडीत मोठी फूट?
दुसरीकडे महाविकास आघाडीत मोठी फूट पडल्याचं बोललं जात आहे, एकिकडे काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याने दुसरीकडे मविआत समन्वय नसल्याचं समोर आलं आहे. त्यात उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. कारण नाशिकमधून शुभांगी पाटील यांना राष्ट्रवादी व ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे तर, काँग्रेसचा निर्णय अजून बाकी आहे, त्यामुळं मविआत फूट पडली आहे का? अशी चर्चा सुरु आहे.
भाजपाचा तांबेंना पाठींबा
सत्यजीत तांबेंनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे, पण जर त्यांनी पाठिंबा मागितला तर आम्ही देऊ, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं तांबे हे भाजपाचा पाठिंबा घेणार का, हे पाहवे लागणार आहे.
आजच्या बैठकीत निर्णय होणार?
आज शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची बैठक होत आहे, या बैठकीत विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी पाठिंबा देण्याबाबत निर्णय होणार आहे. या बैठकीला तिन्ही पक्षातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं नाशिकमध्ये कोणाला पाठिंबा द्याचा यावर शिक्कामोर्तब होईल असं बोललं जात आहे.
कुणकुण लागली होती…
दरम्यान, तीन टर्म आमदार असल्याने या जागा वाटपावर चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीतील नेते एकमेकांशी चर्चा करत होते. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही चर्चा झाली होती. आताही ते सतत फोनव्दारे संपर्कात आहेत. मात्र नाशिक येथे काहीतरी गडबड आहे याची कुणकुण लागली होती आणि याची कल्पना कॉंग्रेसच्या वरिष्ठांना दिली होती असेही अजित पवार यांनी सांगितले.
नाशिकमध्ये घोळ…
दरम्यान, कॉंग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली असताना अर्ज दाखल न केल्यामुळे नाशिकमध्ये पेच निर्माण झाला आहे. आघाडी म्हणून जागा वाटप करताना औरंगाबाद (विक्रम काळे) ही जागा राष्ट्रवादीकडे तर नाशिक कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली मात्र, त्यांनी अर्ज भरला नाही. त्यामुळं पक्षाने सुधीर तांबेंवर कारवाई केली आहे. तर त्यांचा मुलगा सत्यजीत तांबेंनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं नाशिकमधला घोळ वाढला आहे.