दहावी बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट!  मे महिन्याच्या अंतिम आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

    पुणे : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पार पडल्या. यानंतर आता विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दहावी आणि बारावीच्या लाखों परीक्षार्थ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यर्थ्यांना पहिल्यांदा ऑनलाइन स्वरुपात निकाल पाहता येणार आहे. निकालाची तारीख समोर आली आहे.

    राज्यामध्ये यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली तर दहावीची परीक्षा 1 मार्च पासून सुरू झाली होती. बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 14 लाख 28 हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. 3 हजार 320 परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा घेण्यात आली. दुसरीकडे 5 हजार 86 केंद्रावर दहावीची परीक्षा घेण्यात आली. यावर्षी एकूण 31 लाख विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीची परीक्षा दिली. या वर्षी भरारी पथकांची संख्या देखील वाढवण्यात आली होती.

    कधी लागणार निकाल?

    दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यामध्ये आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यंदा MSBSHSE चे निकाल मे महिन्यातच लागणार आहेत. बोर्डाकडून पहिल्यांदा मे महिन्याच्या मध्यावर 12वीचा आणि नंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 10 वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. काही मिडीया रिपोर्ट्सनुसार, 11 मे दिवशी बोर्डाकडून निकाल जाहीर केला जाऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. मात्र या तारख्यांवर अद्याप बोर्डाकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.