खड्ड्यात गाडी आदळून अपघात, तरुणाचा मृत्यू; वडिल गंभीर जखमी

पुण्यात खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, सहप्रवासी त्याचे वडिल गंभीररित्या जखमी झाले आहेत. खडकवासला धरणावरील पुलापासून पन्नास मिटरवर एनडीए रोडकडे जाताना अपघात घडला आहे. 

    पुणे : पुण्यात खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, सहप्रवासी त्याचे वडिल गंभीररित्या जखमी झाले आहेत. खडकवासला धरणावरील पुलापासून पन्नास मिटरवर एनडीए रोडकडे जाताना अपघात घडला आहे.
    प्रसाद गोविंद करंजावणे (वय ३१, रा. भुकुम, ता. मुळशी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गोविंद दगडू करंजावणे (वय ६५) हे गंभीररित्या जखमी झाले असून, त्यांचा हात फॅक्चर झाला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद हे दुचाकीवरून त्यांच्या वडिलांसह खडकवासला धरणावरील पुलावरून जात होते. या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. पुल क्रॉस केल्यानंतर पन्नास मिटर अंतरावर एनडीए रोडकडे जात असताना त्यांची दुचाकी एका खड्यात आदळली आणि ते खाली कोसळले. यात गंभीर मार लागल्याने प्रसाद यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर वडिल गोविंद यांचा हात फॅक्चर झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.