माजलगाव शहरातून बजरंग सोनवणेंची दुचाकी रॅली; जोरदार घोषणांनी शहर दणाणले

बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची सोमवारी सकाळी कार्यकर्त्यांनी माजलगाव शहरातून ढोल ताशांच्या गजरात दुचाकी रॅली काढली. यावेळी बजरंग सोनवणे यांनी बुलेटवर स्वार होऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.

    बीड : बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची सोमवारी सकाळी कार्यकर्त्यांनी माजलगाव शहरातून ढोल ताशांच्या गजरात दुचाकी रॅली काढली. यावेळी बजरंग सोनवणे यांनी बुलेटवर स्वार होऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी बजरंग बली की जय असा जयघोष करीत शहर दणाणून सोडले.

    बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे सोमवारी सकाळी माजलगाव तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी सोनवणे यांनी शहरातील अनेक ठिकाणी भेटी देत मतदारांशी संवाद साधून लोकसभेच्या निवडणुकीत निवडून द्यावे, असे आवाहन केले.

    त्यानंतर कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते. तर रॅलीत उमेदवार बजरंग सोनवणे हे स्वतः बुलेटवर स्वार झाले होते. शहरातून रॅली काढत असताना रस्त्यावरील महापुरूषांच्या नावांच्या चौकाला त्यांनी पुष्पहार अर्पण केले. तर वाटेत अनेकांनी त्यांचे हार घालून स्वागत केले. रॅलीत सहभागी झालेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी बजरंग सोनवणे की जय व बजरंग बली की जय अशा घोषणा देत शहर दणाणून सोडले.

    यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते मुत्सद्दीकबाबा, काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष
    नारायण होके, शिवसेनेचे उबाठा गटाचे तालुका प्रमुख पप्पु धरपडे, राजेश घोडे, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष नारायण डक, शेतकरी कामगार पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. नारायण गोले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोहर डाके, दयानंद स्वामी, कचरू खळगे, मनोज फरकेयांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना ठाकरे गट व मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.