Rushing dumper crushed the woman! Gangadham Road incident; Traffic despite the ban on heavy vehicles

घनसावंगी ते अंबड रोडवर बोंधलापुरी फाट्याजवळ खडी घेऊन चाललेल्या (विना नंबरच्या) भरधाव हायवाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी (दि.23) सकाळी अकराच्या सुमारास घडली.

    घनसावंगी : घनसावंगी ते अंबड रोडवर बोंधलापुरी फाट्याजवळ खडी घेऊन चाललेल्या (विना नंबरच्या) भरधाव हायवाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी (दि.23) सकाळी अकराच्या सुमारास घडली.

    योगीराज पांडुरंग वैराळ (वय 30, रा. मनुबाई जवळा, ता. गेवराई) असे होते. घटनेची माहिती मिळताच घनसावंगीचे पोलिस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल रंजित वैराळ हे करत आहेत.

    घनसावंगी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील मनुबाई जवळा येथील तरुण युवक योगीराज पांडुरंग वैराळ हा आपल्या गावाकडून अंबडला आपल्या पाहुण्याला भेटण्यासाठी जात असताना सकाळी अकराच्या सुमारास कुंभार पिपळगावकडे खडी घेऊन चाललेल्या एका भरधाव हायवाने बोंधलापुरी फाट्यावर दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिल्याने हा तरुण युवक जागीच ठार झाला.