औरंगाबादेत दुचाकीस्वारांना ट्रकने चिरडले; दोन बहिणींसह भावाचा जागीच मृत्यू

दीपक लोखंडे (वय २०), अनिता लोखंडे (वय २२) आणि निकिता लोखंडे (वय १८), अशी मृतांची नावे असून ते रांजणगाव येथील रहिवासी आहेत. रांजणगाव, कमळापूर येथील आसाराम बापूनगरात राहणाऱ्या अनिता कचरू लोखंडे आणि निकिता कचरू लोखंडे या दोघी बहिणी वाळूज औद्योगिक परिसरातील रेणुका ऑटो इंड्ट्रीज या कंपनीमध्ये कामाला आहे. त्यांना कामावर सोडण्याचे काम भाऊ दीपक लोखंडे करत होते.

    औरंगाबाद – भरधाव ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात (Accident) तिघा जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास वाळूज एमआयडीसी (Waluj MIDC) येथे घडली. येथील एनआरबी बेअरिंग कंपनीच्या (NRB Bearing Company) समोरील चौकात हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील दोन बहिणी आणि एका भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.

    दीपक लोखंडे (वय २०), अनिता लोखंडे (वय २२) आणि निकिता लोखंडे (वय १८), अशी मृतांची नावे असून ते रांजणगाव (Ranjangaon) येथील रहिवासी आहेत. रांजणगाव, कमळापूर येथील आसाराम बापूनगरात राहणाऱ्या अनिता कचरू लोखंडे आणि निकिता कचरू लोखंडे या दोघी बहिणी वाळूज औद्योगिक परिसरातील रेणुका ऑटो इंड्ट्रीज (Renuka Auto Industries) या कंपनीमध्ये कामाला आहे. त्यांना कामावर सोडण्याचे काम भाऊ दीपक लोखंडे करत होते.

    वाळूज एमआयडीसीत नियमितणे सकाळची पहिली शिफ्ट सुरू होण्याची घाई असल्याने कंपनीत जाण्यासाठी कामगारांची लगबग सुरू होती. याचदरम्यान, रांजणगाव फाट्यावरून पुढे येताच त्यांच्या दुचाकीला ट्रकचा धक्का लागून तिघेही ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाले. ही घटना मॅन डिझेल कंपनीच्या समोरील मुख्य मार्गावर घडली. घटनेनंतर अर्ध्या तासाने स्थानिक व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना रुग्ण घाटी रुग्णालयात रवाना केले.