कोट्यावधीची कामे न करताच बिले केली जात आहेत अदा, आमदार एकनाथ खडसे यांचा आरोप

भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा हा प्रकार असून त्याविरुद्ध न्यायालय औरंगाबाद यांनी रेट याचिका क्रमांक ६४९५२०/२०२२ ही १२ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आलेली आहे. यात सुनावणी होऊन तथ्य देखील आढळले असून न्यायालयाने सदर प्रकरणात अवर सचिव पूजा उदवंत तसेच कार्यकारी अधिकारी परदेशी इब्राहिम शेख गणेश पाटील आणि मक्तेदार उज्वल बोरसे यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे.

    मुक्ताईनगर – मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कोट्यावधीची कामे न करता बिले अदा करण्यात आल्याची तक्रार माजी मंत्री व विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे व माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

    गेल्या सात ते आठ महिन्यांपूर्वी माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे व सुभाष दिनकर पाटील यांनी यासंदर्भात तत्कालीन व सर्वांनी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार केलेली होती. या तक्रारी मध्ये वडोदा -मच्छिंद्रनाथ हा रस्ता तीन कोटी २० लक्ष रुपये, कोथळी ते वडवे चांगदेव रस्ता चार कोटी पन्नास लक्ष रुपये ५० लक्ष रुपये न करता बिले काढलेली आहेत. कोणत्याही प्रकारचे काम न करता परस्पर बनावट व खोटी बिले बांधकाम विभागाला सादर करून बांधकाम विभागाचे अधिकारी पाटील गणेश पाटील, इमरान शेख व रवींद्र परदेशी यांनी व मक्तेदार उज्वल बोरसे यांनी अपहार केल्याची तक्रार केली होती. या संदर्भात चौकशीचे आदेशही दिले होते. गुणवत्ता विभाग नाशिक यांनी चौकशी देखील केलेली आहे व त्यात तथ्य आढळून आले असून त्यांच्याविरुद्ध कोणतेही कारवाई अद्याप येतो करण्यात आलेली नाही. यात अधिकाऱ्यांची बदली करण्यात आलेली आहे. मात्र राजकीय दबावामुळे सदर अधिकाऱ्यांवर बांधकाम विभागाच्या अव्वर सचिव पूजा उदवंत यांनी कारवाई थांबवलेली आहे.

    भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा हा प्रकार असून त्याविरुद्ध न्यायालय औरंगाबाद यांनी रेट याचिका क्रमांक ६४९५२०/२०२२ ही १२ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आलेली आहे. यात सुनावणी होऊन तथ्य देखील आढळले असून न्यायालयाने सदर प्रकरणात अवर सचिव पूजा उदवंत तसेच कार्यकारी अधिकारी परदेशी इब्राहिम शेख गणेश पाटील आणि मक्तेदार उज्वल बोरसे यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. तसेच बोरसे याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी करण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाने २० ऑक्टोबर पर्यंत आपले म्हणणे मांडावे असे बांधकाम विभागाला आदेश दिलेले आहेत.तसेच या सर्व कामांचे थर्ड पार्टी ऑडिट करून चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी देखील पत्रकार परिषदेत करण्यात आली.

    २० तारखेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मतदार संघात येणार असल्याची माहिती मिळत असून विकासासाठी प्रलंबित असलेले कामे मार्गे लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली. कुऱ्हा आणि बोदवड उपसा सिंचन वरणगाव उपसा सिंचन योजना ही अर्धवट स्थितीत असून मुक्ताईनगर पशु महाविद्यालय हे सर्व प्रतीक्षेत असून त्याला मंजुरी मिळण्याची देखील त्यांनी प्रसंगी मागणी केली. खानदेश साठी कृषी विद्यापीठ करण्याबाबत मान्यतेसाठी प्रस्ताव पडून आहे त्याला मान्यता मिळावी. तसेच वरणगाव पोलीस प्रशिक्षण केंद्र एस आर पी ट्रेनिंग सेंटर जागा उपलब्ध असून तातडीने सुरू करण्यात यावे ,हिंगोणा तालुका यावल येथे केळी संशोधन केंद्रला जागा उपलब्ध असून मंजुरी देखील मिळालेली आहे.

    पाल तालुका रावेर येथील फलोत्पादन हॉर्टिकल्चर कॉलेजला शंभर एकर जागा उपलब्ध करून दिली असून त्याला मान्यता मिळावी, कोथळी मुक्ताईनगर येथील एकात्मिक तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत शंभर कोटी पैकी प्रकल्पास आतापर्यंत १६कोटी प्राप्त झालेले आहेत उर्वरित निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, तसेच नवीन क्रीडा संकुलासाठी एक लाख चौरस मीटर जागा ही नवीन मुक्ताई मंदिराच्या पादुकांच्या बाजूला उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याला देखील तत्काळ कार्यान्वित करण्याची मागणी याप्रसंगी पत्रकार परिषदेत त्यांनी केले.