बिरदेव मंदिराला लवकरच  ब वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा ; जिल्हाधिकार्‍यांचे सीईओ यांना प्रस्ताव सादर करण्याचे  आदेश

कुंभोज (ता.  हातकणंगले) येथील बिरदेव मंदिरा व परिसरास ब वर्ग  तीर्थस्थळाचा दर्जा देण्याबाबतचे हालचाली गतिमान झाल्या आहेत.  दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना पत्र पाठवून तातडीने प्रस्ताव तयार करा, असे आदेश दिले आहेत.

  हातकणंगले :   कुंभोज (ता.  हातकणंगले) येथील बिरदेव मंदिरा व परिसरास ब वर्ग  तीर्थस्थळाचा दर्जा देण्याबाबतचे हालचाली गतिमान झाल्या आहेत.  दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना पत्र पाठवून तातडीने प्रस्ताव तयार करा, असे आदेश दिले आहेत.  त्यामुळे नजीकच्या काही महिन्यातच कुंभोजच्या हिवरखान मंदिरला तीर्थस्थळाचा दर्जा देण्याबाबत धनगर समाजाचे स्वप्न सत्यात उतरण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत

  यशवंत सेनेचे हातकणंगले तालुका अध्यक्ष सागर पुजारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मागील आठवड्यात पर्यटनमंत्री आदिती तटकरे यांची मुंबई मंत्रालयात भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली होती.  सध्या बिरदेव मंदिर परिसराचा समावेश क वर्ग ग्रामीण यात्रा स्तरमध्ये समावेश आहे.  परंतु,  हिवरखान बिरदेव मंदिर हे पंचक्रोशीतील भक्तांचे श्रद्धास्थान आहे.  कर्नाटक आणि महाराष्ट्र येथून अनेक भक्त भाविक या ठिकाणी येत असतात.  त्यांना सोयीसुविधा पुरण्यासाठी निधीची कमतरता भासते.  यासाठी राज्य शासनाकडून आर्थिक मदत व्हावी,  असे प्रयत्न होते.  परंतु,  ब वर्ग पर्यटन आणि तीर्थ स्थळ यात्रा स्थळ दर्जा नसल्यामुळे निधी मिळण्यास अडचण ठरत आहे.

  राज्यमंत्री तटकरेंच्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांची कार्यवाही
  या पार्श्वभूमीवर   सागर पुजारी यांनी बिरदेव मंदिरास पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू केला. याबाबत मंत्री तटकरे यांची तीन ते चार वेळा भेट घेऊन विषय लावून धरला होता.  त्यानंतर मागील आठवड्यात तटकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष पत्र पाठवून याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.  त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली आहे त्यामुळे कुंभोज पंचक्रोशीत समाधान व्यक्त असून सागर पुजारी यांच्या प्रयत्नाचे स्वागत होत आहे

  धनगर समाजासह पंचक्रोशीतील नागरिकांच श्रद्धास्थान असलेले हिवरखान बिरदेव मंदिर यात्रा दर तीन वर्षांनी भरते. पुढील यात्रा ब वर्ग दर्जा म्हणूनच पूजाअर्चा होईल, असा विश्वास आहे.

  सागर पुजारी, यशवंत सेना, तालुका अध्यक्ष, हातकणंगले.