डंपर आणि कारचा विचीत्र अपघात; आजोबा व नातवाचा मृत्यू

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपा कुलकर्णी या मुळचा नाशिकच्या आहेत. त्यांचे सासर पुण्यात आहे. त्या पुण्यातच राहतात. दरम्यान, त्यांचे आई-वडिल पुण्यात आले होते. त्यांना घेऊन त्या नाशिकला जात होत्या. दीपा या कार चालवत होत्या. त्या पुणे-नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरातल्या ओम साई हॉटेलच्या समोर आल्यानंतर डंपरने चालकाने रस्त्याच्यामध्ये डिव्हायडर कट असणाऱ्या ठिकाणावरून डंपर वळविण्यासाठी अचानक घातला अन त्याचवेळी समोरून आलेल्या कारला उडविले.

    पुणे – भरधाव डंपर आणि कारमध्ये झालेल्या विचीत्र अपघातात आजोबा आणि दीड वर्षचच्या नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाली आहे. चालकाने नगर रस्त्यावरील लोणीकंद येथे रस्त्याच्यामध्ये कट असणाऱ्या डिव्हायडरमधून अचानक डंपर वळविल्याने हा भीषण अपघात झाला.

    अद्वैत अमोल कुलकर्णी (दीड वर्ष) आणि महेश शंभुस (वय ६०, रा. मोशी) असे मृत्यू झालेल्या नातवाचे व आजोबाचे नाव आहे. याप्रकरणी डंपरवरील चालकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अद्वैतची आई व महेश यांची मुलगी दीपा कुलकर्णी (वय ३१) यांनी तक्रार दिली आहे. अपघातात दीपा व त्यांची आई निलिमा या जखमी झाल्या आहेत. रविवारी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपा कुलकर्णी या मुळचा नाशिकच्या आहेत. त्यांचे सासर पुण्यात आहे. त्या पुण्यातच राहतात. दरम्यान, त्यांचे आई-वडिल पुण्यात आले होते. त्यांना घेऊन त्या नाशिकला जात होत्या. दीपा या कार चालवत होत्या. त्या पुणे-नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरातल्या ओम साई हॉटेलच्या समोर आल्यानंतर डंपरने चालकाने रस्त्याच्यामध्ये डिव्हायडर कट असणाऱ्या ठिकाणावरून डंपर वळविण्यासाठी अचानक घातला अन त्याचवेळी समोरून आलेल्या कारला उडविले. त्यात गंभीर जखमी झाल्याने दीपा यांचे वडिल महेश व दीपा यांचा मुलगा अद्वैत यांचा मृत्यू झाला. तर, दीपा व त्यांची आई जखमी झाली आहे.

    अपघात इतका मोठा होता की, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात होताच डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाला. माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पसार झालेल्या चालकाला आज ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुहास पाटील हे करत आहेत.