भाजपाने देखील दिले श्रीकांत शिंदे यांना कामाच्या श्रेय

  कल्याण : सत्तेत शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र आहेत. मात्र कल्याण लोकसभेत या दोघांमध्ये आलबेल नाही. हे वारंवार दिसून आले आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर टिका केली जाते. मात्र कल्याण पूर्वेतील एका स्मशानभूमीच्या विकास कामाच्या कार्यक्रमात दोन्ही पक्षाचे नेते एकत्र आले. पाठपुरावा आम्हीच केला असे दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यानी सांगितले. मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामुळे हे काम होत आहे. हे दोन्ही पदाधिकाऱ्यांनी मान्य केले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड, भाजप महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी उपस्थित होत्या.

  कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये धूसफूस सुरु आहे. शिवसेना नेत्यांकडून तसेच भाजप नेत्यांकडून वारंवार एकमेकांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या टिका केली जाते. काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याणमधये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या घरी आले होते. तेव्हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी समस्यांचा पाढा वाचला. कशा प्रकारे प्रशासन त्यांच्यासोबत दुजाभाव करीत आहे हे सांगितले. भाजप आमदारांकडून नेहमीच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर टिका केली जाते. सध्या या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अद्याप मनसे जुळलेली नाहीत असे चित्र आहे.

  हे सगळे हाेत असताना कल्याण पूर्वेतील कचोरे गावातील जुनी स्मशान भूमीची दुरावस्था होती. या स्मशान भूमीच्या विकासाकरीता वारंवार मागमी केली जात होता. आज या स्मशानभूमीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी कल्याण पूर्वेचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड, भाजप महिला जिल्हाध्यक्ष रेखा चाैधरी, शिवसेना पदाधिकारी मनोज चौधरी, समाजसेवक प्रकाश चौधरी, भगवान चौधरी, रघूनाथ मुकादम आदी उपस्थित हाेते.

  या वेळी भाजप महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी यांनी सांगितले, कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार शिंदे यांच्याकडे या कामाकरीता पाठपुरावा करीत होते. त्याकामाकरीता खासदारांनी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामुले त्यांचे मनापासून आभार. गणेश घाटाकरीता केंद्रीय मंत्री कपील पाटील आणि खासदार शिंदे यांनी फूटआोेव्हर ब्रीजला मंजूरी दिली आहे. ते देखील काम पूर्ण होणार आहे.

  शिवसेना पदाधिकारी मनोज चाैधरी यांनी सांगितले की, फार वर्षापासून दुर्लक्षित असलेली स्मशानभूमी होती. पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार केले जात होते. ही बाब खासदार शिंदे यांच्या निदर्शनास आणले. त्यांनी या कामाला खासदारांनी ६० लाख रुपयांचा निधी दिली. त्यामुळे हे काम होत आहे.

  शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी सांगितले की, खासदारांनी या कामासाठी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मनेज चाैधरी आणि रेखा चौधरी यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.