शरद पवारांच्या आव्हानाला भाजपकडून प्रतिउत्तर, ‘हे सवाल’ विचारत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

कोणत्याही प्रकारची चौकशी (inquiry) करायची असेल तर लवकर करा, पण आरोप खोटे ठरल्यास त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा सवालही पवार यांनी राज्य सरकारला विचारला आहे. दरम्यान, याला आता भाजपाकडून (BJP) प्रतिउत्तर आले असून, भाजपाने सुद्धा काही सवाल शरद पवार यांना विचारले आहेत.

    मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (patra chwal case) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे तुंरुगाची हवा खात असताना, याप्रकरणात शरद पवार (Sharad pawar) यांचा सुद्धा सहभाग असल्याचा काल भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी आरोप केला होता, त्यानंतर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत यावर स्पष्टीकरण दिले आहे. कोणत्याही प्रकारची चौकशी (inquiry) करायची असेल तर लवकर करा, पण आरोप खोटे ठरल्यास त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा सवालही पवार यांनी राज्य सरकारला विचारला आहे. दरम्यान, याला आता भाजपाकडून (BJP) प्रतिउत्तर आले असून, भाजपाने सुद्धा काही सवाल शरद पवार यांना विचारले आहेत.

    दरम्यान, ७०० च्यावर मराठी कुटुंब बेघर झाले तेव्हा पवारसाहेब आपण काय केलं. तुम्ही केंद्रीय कृषिमंत्रीपदी असताना, एका चाळीच्या पुनर्वसनसाठी ‘म्हाडा’ च्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीत काय करत होता? साहेब, तुमच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प होत होता तर एवढी ससेहोलपट मराठी माणसाची का झाली? देशाचे कृषीमंत्री म्हाडाच्या बैठकीत कशासाठी? असे  काही सवाल भाजपने शरद पवारांना विचारत कोडींत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळं भाजपाच्या या प्रश्नांना पवार कधी व कसे उत्तर देतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.