महाराष्ट्रात दंगे घडावे, राज्यात अशांतता निर्माण व्हावी यासाठी भाजपाने राणांना सुपारी दिली; राष्ट्रवादीचा घणाघाती आरोप

राणा प्रकरणावरून धुळ्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. राणा दाम्पत्य हे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा घणाघाती आरोप अनिल गोटे यांनी केला. गेल्या काही महिन्यांपासून बघितले तर महाराष्ट्रात दंगे घडावे, राज्यात अशांतता निर्माण व्हावी आणि याचे सारे खापर महाविकास आघाडी सरकारवर फुटावे असा प्रयत्न भाजपातर्फे सुरू आहे, असा दावा गोटेंनी केला(BJP betrayed Rana to cause riots in Maharashtra and create unrest in the state NCP allegations).

    धुळे : राणा प्रकरणावरून धुळ्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. राणा दाम्पत्य हे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा घणाघाती आरोप अनिल गोटे यांनी केला. गेल्या काही महिन्यांपासून बघितले तर महाराष्ट्रात दंगे घडावे, राज्यात अशांतता निर्माण व्हावी आणि याचे सारे खापर महाविकास आघाडी सरकारवर फुटावे असा प्रयत्न भाजपातर्फे सुरू आहे, असा दावा गोटेंनी केला(BJP betrayed Rana to cause riots in Maharashtra and create unrest in the state NCP allegations).

    ‘मातोश्री’च्या बाहेर हनुमान चालीसा पठण करण्यावरून नवनीत राणा यांनी घातलेल्या वादावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अनिल गोटेंनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरबाहेर झालेल्या हिंसक आंदोलनानंतर कुठल्याही ज्येष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करणे हे चुकीचे असल्याचे फडणवीस म्हणाले होते. परंतु नवनीत राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा केल्यानंतर फडणवीसांनी त्यांना का थांबवले नाही? असा सवाल गोटेंनी केला.

    नवनीत राणा प्रकरणासंदर्भात भाजपाची भूमिका ही ‘मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली’ अशीच काहीशी आहे. प्रकरणामध्ये भाजपाने उघडउघड पाठिंबा न देता हे सर्व प्रकरण घडवून आणले. नवनीत राणा प्रकरण भाजपाकडून व्यवस्थितपणे चिघळवण्यात येत आहे. भाजपाचा हा कांगावा असून याला महाराष्ट्राची जनता विटली आहे. आपल्या अधिपत्याखाली असलेल्या अधिकारांचा वापर करून विरोधकांना नामशेष करण्याचा प्रयत्न भाजपातर्फे सुरू असल्याचा आरोप अनिल गोटेेंनी केला.