भाजपा सत्तेत आल्यापासून देशात केंद्रीय तपास यंत्रणा अधिक सक्रीय, २०१४ नंतर ईडी कारवायांमध्ये चार पट वाढ

मागील 18 वर्षात ईडीने (ED) 147 राजकारण्यांविरोधात कारवाई केली होती, यातील 85 टक्के राजकारणी (Political) हे विरोधक होते असं दिसून आलं आहे. तर मागील आठ वर्षात याच ईडी कारवायांमध्ये तब्बल चार पटीने वाढ (increase) झाली आहे.

    मुंबई : देशात जेव्हापासून भाजपाची (BJP) सत्ता आली आहे, तेव्हापासून केंद्रीय तपास यंत्रणा (Central Investigation Agency) अधिक सक्रीय झाल्या आहेत. मागील 18 वर्षात ईडीने (ED) 147 राजकारण्यांविरोधात कारवाई केली होती, यातील 85 टक्के राजकारणी (Political) हे विरोधक होते असं दिसून आलं आहे. तर मागील आठ वर्षात याच ईडी कारवायांमध्ये तब्बल चार पटीने वाढ (increase) झाली आहे.

    दरम्यान, खासकरुन ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाहीय, त्या राज्यात केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या धाडी आदी कारवायांमध्ये एक दोन नाही तर तब्बल चार पटीने वाढ झाल्याचे वास्तव समोर आले आहे. मुख्यत: विरोधकांवर मोठ्या प्रमाणात धाडी तसचे कारवांया झाल्या आहेत. त्यामुळं भाजपा सत्तेचा तसेच केंद्रीय तपास यंत्रणेंचा गैरवापर करतेय असा आरोप विरोधकांनी सुद्धा केला आहे.