‘भाजप जिंकूच शकत नाही, म्हणून फोडाफोडी सुरुये’; अनिल देशमुख यांचा भाजपवर निशाणा

महाराष्ट्रात स्वबळावर (Maharashtra Politics) निवडून येण्याची धमक आता भाजपमध्ये नाही. म्हणून फोडाफोडी केली जात आहे, असा घणाघात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला.

  नागपूर : महाराष्ट्रात स्वबळावर (Maharashtra Politics) निवडून येण्याची धमक आता भाजपमध्ये नाही. म्हणून फोडाफोडी केली जात आहे, असा घणाघात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विदर्भ, नागपूर शहर व जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचा दावाही त्यांनी केला.

  देशमुख म्हणाले, भाजप पुढील लोकसभा, विधानसभा जिंकण्याबाबत साशंक असल्याने आता भाजपने राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोबत घेतले. भाजप केवळ अन् केवळ फोडाफोडीचे राजकारण करून राज्यातील जनतेच्या महत्त्वांच्या प्रश्नांना बगल देत आहे. भाजपकडून महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे, असेही ते म्हणाले.

  गणेशपेठ कार्यालयात बैठक

  रविवारी राष्ट्रवादीच्या गणेशपेठ येथील कार्यालयात शहर व जिल्हा ग्रामीणची बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील चारशे ते पाचशे व ग्रामीणमधील तेवढेच कार्यकर्ते सहभागी होते. सर्वांनीच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले. केवळ बोटावर मोजण्याएवढे पदाधिकारी, कार्यकर्ते गेल्याचे ते म्हणाले.

  ‘ऑफर’ मलाही…

  अजित पवार व काही नेते सत्तेत सहभागी झाले. इतरांप्रमाणे मलाही ऑफर होती; परंतु मी गेलो नाही. मी शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला, असे देशमुख म्हणाले.