धक्कादायक! बीडमध्ये भाजप शहर अध्यक्षाची स्वता: वर गोळी झाडून घेत आत्महत्या

सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून पुढीस तपास सुरू आहे

    बीड : बीडमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. भाजपच्या शहर अध्यक्षाने आत्महत्या केल्याची माहिती आहे. भगीरथ बियाणी (Bhagirth Biyani )असं त्यांच नाव आहे. त्यांनी स्वता: वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येच कारण अदयाप समोर आलेलं नाही.

    आज सकाळी बीडमधे भाजपचे बीड शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे बीड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र, बियाणी यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याबाबत काही माहिती मिळाली नाही. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून पुढीस तपास सुरू आहे.