पुण्यात वातावरण तापलं! निखिल वागळे विरुद्ध भाजप वाद पोहचला शिगेला

भाजपने निखील वागळे यांच्या फोटोला चपलांचा हार घालत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर दुसरीकडे पुरोगामी संघटनांनी सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पुण्यामध्ये पोलिसांनी (Pune Police) परिस्थिती सांभाळत दोन्ही संघटनांना रोखले आहे.

    पुणे – पुण्यामध्ये भाजप (BJP) विरुद्ध पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) यांच्यामधील वाद चिघळला आहे. शहरात ‘निर्भय बनो’ सभेचे (Nirbhay Bano Sabha) आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पत्रकार निखिल वागळे यांचे प्रमुख भाषण होते. मात्र ही सभा उधळून लावण्याचा इशारा भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी इशारा दिला होता. यानंतर आता भाजपने साने गुरुजी स्मारक (Sane Guruji Samark Pune) येथे जोरदार आंदोलन केले. यावेळी निखील वागळे यांच्या फोटोला चपलांचा हार घालत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर दुसरीकडे पुरोगामी संघटनांनी सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पुण्यामध्ये पोलिसांनी (Pune Police) परिस्थिती सांभाळत दोन्ही संघटनांना रोखले आहे.

    पुण्यामध्ये ‘निर्भय बनो’ सभा होणार होती. मात्र यामध्ये निखिल वागळे यांचे प्रमुख भाषण होणार होते. याला हिंदुत्ववादी संघटना व भाजपकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत सभा उधळून लावण्याचा इशारा दिला. यावेळी निखिल वागळे यांच्या फोटोला चपलांचा हार देखील आंदोलकांनी घातला. तसेच जोडे मोरो आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी हिंदुत्ववादी संघटना व आंबेडकरवादी संघटना आमने सामने आलेल्या दिसून आल्या. पुरोगामी संघटनांनी हातात संविधान व बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर घेत सभेच्या बाजून घोषणा केला. यावेळी दोन्ही गट समोरासमोर आल्यामुळे पुणे पोलिसांनी मध्ये बॅरिकेट देखील लावले. साने गुरुजी स्मरक परिसरामध्ये खूप वेळापासून छावणीचे स्वरुप आलेले असून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

    भाजप निखिल वागळे विरोधात का झालं आक्रमक

    पत्रकार निखिल वागळे हे अनेकदा आपली मतं परखडपणे सोशल मीडियावर मांडत असतात. मात्र यावेळी त्यांनी भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वादग्रस्त विधान केले होते. ट्वीटरवर वादग्रस्त पोस्ट शेअर करत निखिल वागळे यांनी भारतरत्न पुरस्कार दिल्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. यानंतर पुण्यातील त्यांच्या सभेला हिंदुत्ववादी संघटना व भाजपकडून तीव्र विरोध केला जात आहे.