भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांचा ठाकरे गटाला टोला, म्हणाले…

कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे .शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचे उमेदवारी जवळपास निश्चित आहेत.

    कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे .शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचे उमेदवारी जवळपास निश्चित आहेत. मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही तर ठाकरे गटाकडून अनेक दिग्गजांची नावं चर्चेत होती मात्र सस्पेन्स कायम ठेवण्यात आला होता. अखेर आज हा सस्पेन्स सुटलाय शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी वैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली . वैशाली दरेकर या शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या खंद्या समर्थक आहेत .

    कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली याबाबत बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. वैशाली दरेकर यांना दिलेले उमेदवारी म्हणजे महायुतीला “बाय” दिलाय अशा शब्दात भाजप जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांनी ठाकरे गटाला टोला लगावलाय .यावेळी बोलताना त्यांनी वैशाली दरेकर यांनी याआधी देखील लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांना त्यांची ताकद माहित आहे. या मतदारसंघात महायुतीचाच उमेदवार निवडून येणार आणि मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

    वैशाली दरेकर यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेमधून झाली होती.राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वैशाली दरेकर या राज ठाकरे यांच्यासोबत मनसेमध्ये २००९ मध्ये गेल्या होत्या. त्यांनी मनसेमधून लोकसभा निवडणूक देखील लढवली. त्यानंतरच्या काळात त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी ठाकरे गटासोबतच राहणे पसंत केले होते. वैशाली दरेकर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक संघटनात्मक पदे विरोधी पक्षनेता पद देखील भूषवली आहेत.विरोधी पक्षनेता असताना त्यांनी सभागृह दणाणून सोडले होते. वैशाली दरेकर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. याबाबत त्यांना विचारलं असतं त्यांनी समोर कितीही तगड आव्हान असलं तरी लढणार आणि निवडून येणार,असा विश्वास व्यक्त केला आहे.