भाजपा मित्र पक्ष म्हणून जवळ घेतो. नंतर अफजल खानासारखी मिठी मारतो. हे चांगलं नाही, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीतील घटकपक्ष असलेले प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू भाजपाला सातत्याने लक्ष्य करत आहेत. ते हिंगोलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले बच्चू कडू ?
“भाजपाकडून जाणीवपूर्वक खच्चीकरण करण्याचं काम केलं जात आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी अचलपूर मतदारसंघात अनिल बोंडे यांना लक्ष घालण्यास सांगितलं. पण, बोलून कुणी लक्ष घालत नाही. एकीकडं सांगायचं सरकारमध्ये सामील व्हा. सामील झाल्यानंतर अशा प्रकारची भूमिका घ्यायची. हे कुणासाठीही चांगलं नाही.”अशा शब्दात बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, “ज्यांच्याबरोबर आहोत, त्यांच्याशी प्रामाणिक राहणं महत्वाचं आहे. यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होईल. बावनकुळे स्पष्ट बोलले, ‘काहीही करून कसं पाडायचं, कोणत्या पद्धतीनं जायचं.मला वाटतं, भाजपा मित्र पक्ष म्हणून जवळ घेतो. नंतर अफजल खानासारखी मिठी मारतो. हे चांगलं नाही.”