‘मतांसाठी भाजपकडून पैसे वाटप केले जात आहेत’; काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकरांचा आरोप

महाराष्ट्रातील शिरूर, मावळ, पुणेसह सहा लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election) आज मतदान होत आहे. यादरम्यान, रविवारी पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून 4 मतदारसंघ संवेदनशील घोषित करण्याची मागणी केली आहे.

    पुणे : महाराष्ट्रातील शिरूर, मावळ, पुणेसह सहा लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election) आज मतदान होत आहे. यादरम्यान, रविवारी पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून 4 मतदारसंघ संवेदनशील घोषित करण्याची मागणी केली आहे.

    धंगेकर यांनी भाजपकडून मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. धंगेकर यांच्या विरोधात महायुतीतर्फे मुरलीधर मोहोळ निवडणूक लढवत आहेत. पुणे मतदारसंघात कोथरूड, वडगाव शेरी, पर्वती आणि शिवाजीनगर हे मतदारसंघ संवेदनशील घोषित करावेत, अशी मागणी धंगेकरांनी केली आहे. या सर्व भागात दारू आणि पैसे वाटले जात आहेत. गंभीर गुन्हे दाखल असलेले अनेक गुन्हेगार नागरिकांना धमकावत मतदानापासून रोखत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. त्यामुळे अवैध मतदारांची वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात यावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.

    दरम्यान, मतदानाच्या दिवशी पुणे, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.