भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर
भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना परवानगी दिली. मात्र, महाराष्ट्रातील निवडणुका या ओबीसी आरक्षणाविनाच होणार आहेत. यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. भाजपा नेते बबनराव लोणीकर यांनीही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली आहे(BJP leader Babanrao Lonikar strongly criticizes OBC reservation).

    जालना : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना परवानगी दिली. मात्र, महाराष्ट्रातील निवडणुका या ओबीसी आरक्षणाविनाच होणार आहेत. यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. भाजपा नेते बबनराव लोणीकर यांनीही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली आहे(BJP leader Babanrao Lonikar strongly criticizes OBC reservation).

    सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीसंदर्भात दिलेल्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणुका घेऊ. मात्र हे करीत असताना ओबीसी आरक्षणासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

    मध्यप्रदेशला जो न्याय मिळाला तोच न्याय महाराष्ट्रात मिळू शकेल. ओबीसी आरक्षणाचे निकष मध्यप्रदेश राज्याला लागले, तो निकष समोर ठेवून ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार नक्की पाठपुरावा करेल, असे उदय सामंत यांनी सांगितले.