उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा; चंद्रशेखर बावनकुळे यांची पोस्ट व्हायरल

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

    मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना या चॅनलला मुलाखती दिली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आणि शरद पवार यांच्या जोडीला संताजी धनाजी यांची उपमा दिली आणि पंतप्रधान मोदी यांचा औरंगजेब असा उल्लेख केला. यानंतर भाजप देखील आक्रमक झाली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

    काय म्हणाले उद्धव ठाकरे?

    “न बोलावताही पाकिस्तानामध्ये जाऊन नवाझ शरीफांच्या वाढदिवसाचा केक खाणारे लोक मला औरंगजेब फॅन म्हणू शकत नाही. कारण औरंगजेबदेखील गुजरातमध्ये जन्मला होता. जेसे हे दिल्लीला गेलेत तसेच औरंगजेब आग्राला जाऊन बसला होता. महाराष्ट्र जिंकण्यासाठी औरंगबाद 27 वर्षे इथे बसला होता. पण तो पुन्हा कधीच आग्राला जाऊ शकला नव्हता हे त्यांनी लक्षात ठेवावे. असं म्हणतात की मोगलांच्या घोड्यांना पाण्यातही संताजी धनाजी दिसायचे. तसं आम्ही दोघे त्यांचा खेचरांना दिसत असू,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

    चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रत्युत्तर

    उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि अजित ठाकरे व शिंदे गट यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांची मुलाखती गाजली आहे. यामध्ये भाजपला त्यांनी कडक शब्दांत सुनावले आहे. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोस्ट करत सुनावले आहे. बावनकुळे म्हणाले, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असे म्हणत बावनकुळे यांनी पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान आहे की, हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत, महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत आहे. असे देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

    बावनकुळे यांनी उपस्थित केलेले प्रश्न

    १. दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि  विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय ?

    २. १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता ?, हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का ?

    ३. सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात ?

    ४. राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात ?

    ५. उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता ?