देवेंद्र फडणवीस रात्री मुंबईबाहेर, पहाटे मुंबईत दाखल

विरोधपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे संध्याकाळी आठच्या सुमारास त्यांच्या मुंबईतील सागर (Sagar Bunglow) या बंगल्यावरून एकटेच बाहेर पडले. त्यामुळे सत्तास्थापनेच्या खलबतांसाठी वेग आला आहे. मागील दोन दिवसात त्यांनी दिल्लीलाही जाऊन आले आहेत. तसेच, राज्यात सत्तास्थापनेसाठी बैठका झाल्या. त्यामुळे भाजपच्या (BJP) गोटात हालचालींना वेग आला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुंबईबाहेरच होते. पहाटे ते सागर बंगल्यावर पोहोचले आहेत.

    मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आणखी आला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकांनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडामुळे भेटीगाठी वाढल्या आहेत. मोठा राष्ट्रीय पक्ष आपल्या पाठीशी असल्याचे शिंदे यांनी सांगितल्याने खुद्द शरद पवार (Sharad Pawar) हे महाविकास आघाडी सरकार (MVA) वाचवण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

    विरोधपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे संध्याकाळी आठच्या सुमारास त्यांच्या मुंबईतील सागर (Sagar Bunglow) या बंगल्यावरून एकटेच बाहेर पडले. त्यामुळे सत्तास्थापनेच्या खलबतांसाठी वेग आला आहे. मागील दोन दिवसात त्यांनी दिल्लीलाही जाऊन आले आहेत. तसेच, राज्यात सत्तास्थापनेसाठी बैठका झाल्या. त्यामुळे भाजपच्या (BJP) गोटात हालचालींना वेग आला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुंबईबाहेरच होते. पहाटे ते सागर बंगल्यावर पोहोचले आहेत.

    फडणवीस कोणाला भेटले, याबाबत प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली. यामुळे त्यांनी कोणाची घेतली भेट हे अद्याप गुलदस्त्यात आहे. शिंदे गटाच्या नावे सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. शिंदे वास्तव्यास असलेल्या गुवाहाटीतील हॉटेलमध्ये भाजपच्या काही नेत्यांनी उपस्थितीही लावली. सध्या भाजप नेत्यांशी चर्चेला सुरुवात झाली. आज शिवसेनेची कार्यकारिणी बैठक पार पडणार आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदे आज भाजप नेत्यांशी चर्चा करणार आहेत.