BJP leader Kripa Shankar Singh back in Trident

भाजपचे नेते कृपा शंकर सिंह पुन्हा ट्रायडेंटमध्ये दाखल झाल्याचे समोर आले त्यानंतर आमदार फोडाफोडीचे तर्क वितर्क लावले जात आहेत. सिंह हे एका फॅमिली फंक्शनसाठी आलेले कृपा शंकर सिंह वारंवार ट्रायडेंटमध्ये दिसले. रुफ टॉपवर कार्यक्रमादरम्यान ते कोणत्या आमदारास भेटले का? याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. कारण शिवसेनेला समर्थन देणारे तीन आमदार हे आपल्या संपर्कात असल्याचा दावा हा भाजपकडून करण्यात येत आहे(BJP leader Kripa Shankar Singh back in Trident).

    मुंबई : भाजपचे नेते कृपा शंकर सिंह पुन्हा ट्रायडेंटमध्ये दाखल झाल्याचे समोर आले त्यानंतर आमदार फोडाफोडीचे तर्क वितर्क लावले जात आहेत. सिंह हे एका फॅमिली फंक्शनसाठी आलेले कृपा शंकर सिंह वारंवार ट्रायडेंटमध्ये दिसले. रुफ टॉपवर कार्यक्रमादरम्यान ते कोणत्या आमदारास भेटले का? याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. कारण शिवसेनेला समर्थन देणारे तीन आमदार हे आपल्या संपर्कात असल्याचा दावा हा भाजपकडून करण्यात येत आहे(BJP leader Kripa Shankar Singh back in Trident).

    ट्रायडेंट हॉटेलमध्ये शिवसेना आमदार, अपक्ष आमदार हे मुक्कामी असताना एका पाठोपाठ एक भाजपच्या नेत्यांनी ट्रायडेंटमध्ये येण्यास सुरुवात केल्याने वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी आणि भाजप हे दोघेही आपल्या विजयाचा दावा करत आहेत, मात्र गुलाल कुणाचा हे तर निवडणुकीनंतरच कळेल.

    या भेटीगाठींच्या चर्चांबाबत कृपाशंकर सिंह यांना विचारले असता ते म्हणाले, मी एका फंक्शनसाठी आलेलो आहे. शिवसेनेच्या आमदारांना भेटण्यासाठी नाही. योगायोगाने आमदार जर भेटले तर त्यांना नमस्कार करेन आणि सांगेल आमचे उमेदवार महाडिकांना मतदान करा, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.

    दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी आमदारांसोबत बैठकसत्र सुरूच ठेवले आहे. त्यांनी अपक्ष आमदारांना गुरुवारी आपल्या विभागातील कामांची यादी घेऊन बोलावले होतं. यात किशोर जोरगेवार, आशिष जयस्वाल, चंद्रकात पाटील, विनोद निकोले यांना बोलावण्यात आले होते अशी माहिती समोर आला आहे.

    आम्ही महाविकास आघाडी सोबत आहे आणि महाविकास आघाडी उमेदवारांना मतदान करणार आहे. अपक्ष आमदारांची किंमत आता वाढली आहे. पण आमची कामे व्हावी ही आमची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया किशोर जोरगेवार यांनी या बैठकीनंतर दिली आहे.