एकनाथ शिंदे यांच्या नॉट रिचेबलवरून राणेंचे सूचक वक्तव्य

    विधान परिषद निवडणुकीनंतर (MLC Election) आता सर्वात मोठा धक्का शिवसेनेला (Shivsena) बसण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या काही समर्थक आमदारांसह नॉट रिचेबल असून ते सुरत (Surat) येथील ली मेरेडियन हॉटेलमध्ये असल्याचे समोर आले आहे. तसेच, ते दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. यावरून भाजप () नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे (SuratSurat) यांनी मोठे सूचक वक्तव्य केले आहे.

    पुण्यात आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे संपर्काबाहेर असल्याच्या प्रश्नावर त्यांनी सूचक वक्तव्य केले. ते कुठे आहेत याबाबत असे काही सांगावे लागत नाही. त्याला नॉटरिचेबल असण्याला काय अर्थ आहे, असा सूचक प्रश्न त्यांनी केला. तसेच, काँग्रेसचे राहिले काय? राज्यात आणि देशात पक्ष संपत चालला असून विधानपरिषद निवडणुकीत आमदारांवर अंकुश नसल्याने पराभव झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.