पंकजा मुंडे दर्शनासाठी जाणार मोहटादेवी गडावर; काय भूमिका मांडणार? सर्वांचे लागले लक्ष

राज्यसभेच्या व विधान परिषदेच्या निवडणुकीत तिकीटाला हुलकावणी मिळालेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) येत्या मंगळवारी पाथर्डी तालुक्यातील प्रसिद्ध मोहटा गडावरील देवी दर्शनासाठी येत आहेत. या दौऱ्यामध्ये त्या आपली राजकीय भूमिका मांडणार का? याकडे मात्र राजकीय जाणकारांचे लक्ष लागलेले आहे.

    पाथर्डी : राज्यसभेच्या व विधान परिषदेच्या निवडणुकीत तिकीटाला हुलकावणी मिळालेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) येत्या मंगळवारी पाथर्डी तालुक्यातील प्रसिद्ध मोहटा गडावरील देवी (Mohata Devi Temple) दर्शनासाठी येत आहेत. या दौऱ्यामध्ये त्या आपली राजकीय भूमिका मांडणार का? याकडे मात्र राजकीय जाणकारांचे लक्ष लागलेले आहे.

    विधान परिषदेचे व राज्यसभेचे तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्याबद्दल विविध राजकीय पक्षांनी त्यांच्याबद्दल व मुंडे व महाजन कुटुंबाबद्दल राजकीय चिंता व्यक्त केली होती. एवढेच नव्हे तर त्यांनी नवा पक्ष स्थापन केला, तर एमआयएम पक्ष व महाराष्ट्रातील समविचारी बहुजन पक्ष त्यांना आपलं राजकीय समर्थन देणार असेही खासदार इम्तियाज जलिल (Imtiyaz Jaleel) यांनी म्हटले होते.

    येत्या मंगळवारी त्यांचा पाथर्डी व मोहटादेवी दौरा होणार असल्याने त्या काय बोलणार आणि मुंडे यांच्या बोलण्याचा त्यांचे कार्यकर्ते काय अर्थ काढणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यांचे खंदे समर्थक मुकुंद गर्जे यांनी पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पंकजा मुंडे या मुकुंद गर्जे यांना भेटणार आहेत व मोहटादेवी चरणी नतमस्तक होणार आहेत‌.

    पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी पाथर्डी-शेवगाव आणि बीड, औरंगाबाद, जालना, बारामती, पुणे, इंदापूर आदी ठिकाणाहून मोठी गर्दी करणार असून, पंकजा मुंडे या कोणती राजकीय भूमिका घेतात, यासाठी सर्व राजकीय नेत्यांचे पंकजा मुंडे यांच्या पाथर्डी दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.

    महाराष्ट्रातील ओबीसी समाज मुंडे यांच्या पाठीमागे खंबीर उभा असून पंकजा मुंडे यांना राजकारणात दुर्लक्षित केल्यास भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील ७८ विधानसभा मतदारसंघात पक्षाला मोठा फटका बसेल

    – वामन किर्तने, चेअरमन, विविध कार्यकारी सोसायटी, खरवंडी कासार.