विधान परिषदेची सहावी जागा सुद्धा जिंकू, भाजपा नेते प्रसाद लाड यांना विश्वास

राज्यसभेच्या निवडणुका (Rajya sabha) पार पडल्या. आता या निवडणुकानंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकांची (Legislative Council election) जोरात चर्चा सुरु असून, पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विधानपरिषद निवडणुकासाठी मतांची जुळवाजुळवी तसेच रणनिती आखयला सुरुवता झाली आहे. राज्यसभेत दणक्यात विजय मिळवल्यानंतर आता भाजपचा आत्मविश्वास उंचावला असून भाजपाने विधान परिषदेसाठीही आमदारांच्या गाठीभेटी तसेच फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे.

    मुंबई : नुकत्यात राज्यात राज्यसभेच्या निवडणुका (Rajya sabha) पार पडल्या. आता या निवडणुकानंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकांची (Legislative Council election) जोरात चर्चा सुरु असून, पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विधानपरिषद निवडणुकासाठी मतांची जुळवाजुळवी तसेच रणनिती आखयला सुरुवता झाली आहे. राज्यसभेत दणक्यात विजय मिळवल्यानंतर आता भाजपचा आत्मविश्वास उंचावला असून भाजपाने विधान परिषदेसाठीही आमदारांच्या गाठीभेटी तसेच फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. भाजपने आपले ५ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर, सदाभाऊ खोत (Sadabhu Khot) हे भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत. दरम्यान, या सहाही जागा भाजप जिंकेल तसेच सरकार अल्पमतात येईल इतकी मतं भाजपकडे असल्याचा दावा प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं महाविकास आघाडीच्या गोटात चलबिचलता असून, पुन्हा भाजप मविआला धक्का देणार का यावर चर्चा झडताना दिसत आहे.

    दरम्यान, राज्यसभेप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadnvis) विधान परिषदेसाठीही जोरदार तयारी तसेच रणनिती आखली असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी रणनिती आखून ४ उमेदवारांचा कोटा असतानाही ५ व्या उमेदवाराचं आव्हान मविआपुढे ठेवलं आहे. त्यामुळं मविआचे टेन्शन वाढले असून, राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे ही निवडणूकही चुरशीची होणार असल्याचं बोललं जात आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर आमदारांमध्ये असलेली अस्वस्थता, सर्व अपक्ष आणि छोट्या पक्षाचा फडणवीसांवरचा असलेला विश्वास निश्चितपणे या सरकारला अल्पमतात आणण्याइतकं मतदान भाजप आणि पुरस्कृत उमेदवाराला मिळेल, असा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केला. त्यामुळं पुन्हा एकदा भाजप मविआला धक्का देणार असल्याचं बोललं जात आहे.