निवडणुकीत झालेल्या विजयावर विनोद तावडे म्हणाले, ‘काँग्रेसची मानसिकताच त्यांना…’

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी चार राज्यांचे निकाल रविवारी जाहीर झाले. या चारपैकी तीन राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. पण दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोल्समधून मात्र या तीनही ठिकाणी काँग्रेस सत्ता स्थापन करेल असे अंदाज वर्तवण्यात आले होते. पण तसे होऊ शकले नाही, त्यामुळे हे एक्झिट पोल्स फेल ठरले आहेत.

    मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी चार राज्यांचे निकाल रविवारी जाहीर झाले. या चारपैकी तीन राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. पण दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोल्समधून मात्र या तीनही ठिकाणी काँग्रेस सत्ता स्थापन करेल असे अंदाज वर्तवण्यात आले होते. पण तसे होऊ शकले नाही, त्यामुळे हे एक्झिट पोल्स फेल ठरले आहेत. हे पोल्स फेल का ठरले याच्या मागचे कारण विनोद तावडे यांनी सांगितले आहे.

    माध्यमांशी बोलताना तावडे म्हणाले, ‘एक्झिट पोलचे एक तंत्र आहे. पण त्याचे सॅम्पल इतके लहान असते की त्यावर शंभर टक्के बरोबर भाकीत कधीच होऊ शकत नाही. पण दुर्दैवाने ज्यांनी ज्यांनी भाजप आता हारणार, आली तर फक्त मध्य प्रदेश नाहीतर ते ही नाही. मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी गृहमंत्री अमित शहा, अध्यक्ष जेपी नड्डा आम्ही जेव्हा चर्चा करत होतो, तेव्हा आम्हाला स्पष्टपणे छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशात आपणच येऊ आणि तेलंगणात कॉंग्रेसचे सरकार येईल, असे म्हटले होते. कारण आपण जो केसीआर यांच्याविरोधात प्रचार केला त्याचा फायदा आपल्याला न होता काँग्रेसला होईल, असे वाटले होते.

    प्रचाराची पातळी सोडली

    कॉंग्रेसने मुद्द्याच्या आधारे प्रचार केला असता तर त्यांना फायदा झाला असता. राजस्थानात एका दलित महिलांवर अत्याचार झाला त्यावर केंद्रातील एकही नेता बोलला नाही. ही काँग्रेसची मानसिकताच महागात पडली. प्रियंका गांधी म्हणाल्या की, ज्योतिरादित्य शिंदे यांची उंची किती? त्यांनी एखाद्याची उंची काढणे आणि राहुल गांधींनी पनौती म्हणणे हे भारतीय माणसांना पटत नाही.