भाजप नेत्यांकडूनच पंकजा मुंडेंच्या बदनामीचा कट रचला जातोय, पंकजा पक्षावर नाराज नाहीत, भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे. यावर अद्याप पंकजा मुंडे यांची भूमिका समजू शकली नाही. मात्र, पंकजा मुंडेंची बदनामी करणारे भाजप नेते कोण?, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वीच बीडमधील गहिनीनाथ गडावरील एका कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर येणार होते.

    मुंबई – भाजपच्याच नेत्यांकडून पंकजा मुंडेंच्या बदनामीचा कट रचला जातोय, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. भाजपमध्येच एक युनिट आहे. या युनिटकडून पंकजा मुंडे आणि भाजपला बदनाम केले जात आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. हे कोणते युनिट आहे किंवा कोणत्या नेत्यांकडून पंकजा मुंडेंची बदनामी केली जात आहे, हे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले नाही.

    मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे. यावर अद्याप पंकजा मुंडे यांची भूमिका समजू शकली नाही. मात्र, पंकजा मुंडेंची बदनामी करणारे भाजप नेते कोण?, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वीच बीडमधील गहिनीनाथ गडावरील एका कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर येणार होते. त्यामुळे या कार्यक्रमाबाबत चांगलीच उत्सुकता होती. मात्र, पंकजा मुंडे यांनी अचानक आपला गहिनीनाथ गडावरील दौराच रद्द केला. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांना पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबत विचारताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी असे काहीही नसल्याचे सांगितले. तसेच, भाजपच्याच एका युनिटकडून पंकजा मुंडे आणि भाजपला बदनाम केले जात असल्याचे बावनकुळे म्हणाले.

    पंकजा मुंडेंचा व्हिडिओ व्हायरल
    शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यात प्रचार घेत आहेत. नुकताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी बीडमध्ये पंकजा मुंडेंसह दौरा केला. या दौऱ्यादरम्यान झालेल्या एका सभेतील पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. प्रचारसभेत पंकजा मुंडे भाषण करण्यासाठी उठल्या असता त्यांना थांबवून चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः आधी भाषण केले. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्याला आधी भाषण करण्याची विनंती केली. पण, आपण आधी करणार असे म्हणत बा,वनकुळे यांनी भाषण केले. या सर्व घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंकजा मुंडे यांच्या सन्मानार्थ माझ्यानंतर बोलण्याचा मी त्यांना आग्रह केला होता. पंकजा मुंडे या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यामुळे सभेतील शेवटचे अध्यक्षीय भाषण त्यांनी करावे, असा मीच आग्रह केला. पंकजा मुंडे यांच्या सन्मानासाठी मी असे केले. त्याला पंकजा मुंडेंचा अपमान समजणे हास्यास्पद आहे.