भाजपाचं शिवरायांवरील प्रेम खोटे, म्हणून ते राज्यपालांचा बचाव करताहेत – संजय राऊत

खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी भाजपावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे. भाजपाचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यांवरील प्रेम खोटे आहे, म्हणून ते राज्यपालांचा बचाव करताहेत असा आरोप संजय राऊत यांनी भाजपावर केला आहे. भाजपाला जर महाराजांवर प्रेम असते तर त्यांनी राज्यपालांना राज्यातून कधीच हद्दपार केले असते. असं खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

    मुंबई राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल शनिवारी संभाजीनगर येथे मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी काही दिवसांपूर्वी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तेव्हा मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने हा मुद्धा उचलून धरत राज्यपाल व भाजपावर टिका केली होती. तसेच राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उन्हाळी अधिवेशनात सभागृहात देखील उमटले होते.

    दरम्यान, त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळं राज्यातील वातावरण तापले असून, भाजपाच्या आणि राज्यपालांच्या विरोधात राज्यभरात “जोडो मारो आंदोलन” केलं जात आहे. तसेच राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी भाजपावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे. भाजपाचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यांवरील प्रेम खोटे आहे, म्हणून ते राज्यपालांचा बचाव करताहेत असा आरोप संजय राऊत यांनी भाजपावर केला आहे. भाजपाला जर महाराजांवर प्रेम असते तर त्यांनी राज्यपालांना राज्यातून कधीच हद्दपार केले असते. असं खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.