chitra wagh

भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. राजकारण इतक्या खालच्या पातळीला कधीही गेलं नव्हतं, असं त्या म्हणाल्या.

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या दसरा मेळाव्याच्या (Daara Melava) भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नातवाचा उल्लेख केला. शिंदेंच्या नातवाचा नगरसेवक पदावर डोळा आहे, असं ते म्हणाले. त्यावरून आता उद्धव ठाकरेंवर टीका होत आहे.  भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. राजकारण इतक्या खालच्या पातळीला कधीही गेलं नव्हतं, असं त्या म्हणाल्या.

    चित्रा वाघ म्हणाल्या की, शिवसैनिक सोडून स्वत:ला मुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्री झाल्यावरही स्वत:ला पक्षाध्यक्ष पद, शिवसैनिक सोडून स्वत:च्या मुलाला मंत्रीपद, एखादा महिला शिवसैनिकेला सोडून स्वत:च्या घरात संपादक पद ठाकरेंनी दिलं. माझं कुटुंब माझी जबाबदारी पाळणारे ते दिड वर्षाच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतायतं. असं करताना त्याच्या आईच्या मनाची कल्पना त्यांनी केली नाही. तिला काय वाटलं असेल याचाही विचार केला नाही. शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं तुम्ही तेही विसरलात,असं चित्रा वाघ म्हणाल्या.

    राजकारण इतक्या खालच्या पातळीला कधीही गेलं नव्हतं, ज्यांनी ते नेलं त्यांचा निषेध करावा तितका कमीच आहे, असं त्या म्हणाल्या.