भाजपचे मीडिया सहप्रभारी श्याम सप्रे यांचे निधन

भाजपचे (BJP) ज्येष्ठ कार्यकर्ते तथा मीडिया सहप्रभारी (Media Co-Incharge) श्याम सप्रे (Shyam Sapre) यांचे आज पहाटे राहत्या घरी हृदयविकाराच्या (Heart Attack) तीव्र झटक्याने निधन झाले. संघ स्वयंसेवक (RSS) आणि अभाविपचे (ABVP) जुने ध्येयवादी कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती.

    मुंबई : भाजपचे (BJP) ज्येष्ठ कार्यकर्ते तथा मीडिया सहप्रभारी (Media Co-Incharge) श्याम सप्रे (Shyam Sapre) यांचे आज पहाटे राहत्या घरी हृदयविकाराच्या (Heart Attack) तीव्र झटक्याने निधन झाले. संघ स्वयंसेवक (RSS) आणि अभाविपचे (ABVP) जुने ध्येयवादी कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो अशी प्रार्थना करण्यात येत आहे. तसेच, त्यांची अंत्ययात्रा सकाळी साडेबारा वाजता ठाकूरद्वार येथील निवासस्थानाहून निघणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश मीडिया सेल (BJP Media Cell) यांनी दिली.