कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज भाजपाची बैठक; उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता, यांना मिळू शकते संधी?

या पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची परवा बैठक घेतली आहे. तसेच आज देखील भाजपाची महत्त्वाची बैठक होणार असून, दरम्यान, बैठकीनंतर उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.

  पुणे– पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या. २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या पोटनिवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ (Kasba Peth) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कोण उमेदवार हे आज जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या जागेवर भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा आहे.

  नावे जाहीर होणार…

  दरम्यान, पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ (Kasba Peth) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कोण उमेदवार असेल, तसेच पिंपरी चिंचवड यावरून आज महत्त्वाची बैठक होणार आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वात ही बैठक होणारेय. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली जातेय का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र चंद्रकांत पाटील हे आजच्या बैठकीनंतर स्पष्ट होईल असं म्हटलं आहे.

  या नावांची चर्चा…

  या पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची परवा बैठक घेतली आहे. तसेच आज देखील भाजपाची महत्त्वाची बैठक होणार असून, दरम्यान, बैठकीनंतर उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. कसबा पेठेतून शैलेश टिळक, हेमंत रासणे, गणेश बिडकर आणि धीरज घाटे ही चार नावं चर्चेत आहेत. पुणे शहर भाजपकडून पक्षश्रेष्ठीना पाठवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कसबा पेठेतून कोण लढणार यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, सध्या तरी कमळ चिन्ह हाच उमेदवार मानून भाजपा कामाला लागली आहे.

  काय म्हणाले पाटील?

  भाजपाने या दोन्ही ठिकाणी जोरदार तयारी केली आहे. कोणतीही निवडणूक लढवण्यासाठी भाजपाच्या तीन समित्या काम करतात. त्यानुसार पुण्यातील या निवडणुकीसाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. लवकरच उमेदवाराचं नाव निश्चित केलं जाईल. जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात ही निवडणूक चालेल. परंपरागत मतदारसंघ असला तरी मार्जिन कशी वाढेल याकडे आम्ही लक्ष देणार आहोत, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.