भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदारांवर साधला निशाणा

काम अर्धवट पैसे पूर्ण दिले आमदारांनी आयुक्तांना जाब विचारला. दादासाहेब गायकवाड मैदानातील गॅलरी तयार करण्यात आली होती. त्याचे टेंडर ज्या कंपनीला दिले होते.

  कल्याण : गाव आहे मामाचं कोणी नाही कामाचं. सत्तेत जे हिस्सेदारीत बसले आहे. त्यांना कल्याण पूर्वचा विकास करायचा नाही. माझा १२९ कोटीचा निधी कोणी थांबविला हे तुम्हाला माहिती आहे. विविध खात्यातून येणारा प्रत्येक निधी आडविला जातो. कोणी कितीपण आडविले तरी विकास होणारच असे विधान कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी करीत सत्तेतील मुख्यमंत्री आणि त्यांचे खासदार सुपुत्रांचे नाव न घेता लक्ष्य केले आहे. आज गणपत गायकवाड यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेऊन विविध विकास कामे आणि समस्यांबाबत चर्चा केली.

  विविध विषयांवर आमदार आणि आयुक्तांची चर्चा
  कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गायकवाड यांनी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. सगळ्यात महत्वाची पाण्याची समस्या आहे. केडीएमसीचे अधिकारी सांगतात आम्हाला ४९ एमएलडी पाणी मिळते. एमआयडीसेच अधिकारी सांगतात ७० ते ७४ एमएलडी पाणी देतो. प्रत्यक्षात मंजूर कोटा १०४ एमएलडीचा आहे. पाणी कमी येते. त्याविषयी आयुक्तांना सांगितले. त्याचबरोबर रस्त्याची दुरावस्था आहे. मलंग गड रस्ता आणि अंतर्गत रस्ते स्वच्छ करणे. त्यावरील खड्डे भरणे हा एक विषय होता.

  विकास झाला नाही बोलणाऱ्या आमदारांनी सुनावले
  त्याचबरोबर रिझर्वेशनच्या जागा आहेत. त्याठिकाणी गार्डन, मैदान, हॉस्पिटलसाठी आरक्षित आहेत. त्या जागा वर्षोनुवर्षे विकसित केलेल्या नाहीत. काही लोक बोलतात की, आमदार गायकवाड यांनी काय विकास केला. त्यांच्या नेत्यांनी आमच्या समोर येऊन बोलले पाहिजे. त्यांच्या नेत्यांनी, महापौरांनी या जागा विकसित केल्या असत्या तर आज कल्याण पूर्वेतील विकासाचे वेगळे चित्र असते. विकास का दिसत नाही. या आरक्षित जागेवर बेकायदा बाधकामे झालेली आहे. त्या जागा ताब्यात घेतलेल्या नाहीत. या सर्व अडचणी आहेत.

  काम अर्धवट पैसे पूर्ण दिले आमदारांनी आयुक्तांना जाब विचारला. दादासाहेब गायकवाड मैदानातील गॅलरी तयार करण्यात आली होती. त्याचे टेंडर ज्या कंपनीला दिले होते. त्याने अर्धवट काम केले आहे. त्याला कामाचे पैसे पूर्ण दिले आहेत. अशा अनेक गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आयुक्तांसोबत चर्चा करण्यात आली.

  होल्डिंगचे पैसे कोण बुडवत आहे. शहरात ज्या अनधिकृत होर्डींग आहेत. त्याचा टॅक्स किती लोक भरतात. महिन्याला ३० ते ४० लाखाचा टॅक्स बुडतोय. कचऱ्याची समस्या आहे. कचऱ्यांचे टेंडर दिले आहे. त्या कंपन्या कचरा उचलत नाही. टेंडर किती कोटीचे आहे. ते सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये सर्व सामान्यांचा पैसा वाया जात आहे.

  नेत्यांच्या फोन येत असल्याने आयुक्त अडचणीत आले आहेत. विकास कामाबद्दल आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा करतो. मात्र आयुक्तांना काही अडचण असेल. त्यांना काही लोकांचा फोन येत असेल. मात्र मी नेहमी प्रमाणे समस्या सोडविण्याकरीता पाठपुरावा करीतच राहणार असल्याचे आमदार गायकवाड यांनी सांगितले.